पहिला चमचा तीन हजार वर्षांपूर्वी बनला
लंडन : भारतीय लोक शक्यतो बोटांचा वापर करूनच अन्नसेवन करतात. अर्थात आपले अनेक पदार्थही त्यासाठीच योग्य आहेत. काटे-चमच्यांचा वापर करण्याची पद्धत आपल्याकडे पाश्चात्य देशांमधून आली. आता आपल्याकडेही चमचे रुळले आहेत. मात्र हे चमचे सर्वप्रथम कधी बनले याची माहिती आहे का? तीन हजार वर्षांपूर्वी चमचे तयार करण्यास सुरुवात झाली असे मानले जाते.
एसीसिल्वरच्या रिपोर्टनुसार, पुरातत्त्व संशोधकांनी शोधले की पहिला चमचा इसवी सनपूर्व एक हजार वर्षांपूर्वी म्हणजेच आजपासून सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी बनवण्यात आला. इजिप्तमधून याबाबतचे पुरावे मिळालेले आहेत. त्यावेळी त्याचा वापर प्रामुख्याने सजावट किंवा धार्मिक कामांसाठी केला जात होता. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, प्राचीन इजिप्तमधील लोक सर्वात आधी लाकडाच्या, दगडाच्या आणि हस्तीदंताच्या चमच्यांचा वापर करीत होते. हे चमचे अतिशय सुंदर होते. त्यानंतर ग्रीक व रोमन साम—ाज्यांमध्ये कास्य व चांदीचे चमचे बनवले गेले.
महागड्या धातूंचे असल्याने त्यांचा वापर श्रीमंत लोकच करीत असत. युरोपमध्ये मध्ययुगीन काळाच्या सुरुवातीला शिंग, लाकूड, पितळ यापासून चमचे तयार केले जात होते. इंग्रजांच्या इतिहासात चमच्यांचा पहिला उल्लेख सन 1259 मध्ये एडवर्ड प्रथमच्या काळात आढळतो. पंधराव्या शतकात लाकडी चमच्यांची जागा धातुच्या चमच्यांनी घेतली.
Latest Marathi News पहिला चमचा तीन हजार वर्षांपूर्वी बनला Brought to You By : Bharat Live News Media.