नाशिक : सटाणा शहरातील दोन दुकानांना आग

नाशिक : सटाणा शहरातील दोन दुकानांना आग

सटाणा; Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील मुख्य बाजारपेठेतील दोन दुकानांना रविवारी (दि.३१) रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दोन्ही दुकानाची आर्थिक हानी झाली. अग्निशमन दलातर्फे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सटाणा शहरातील मुख्य बाजारपेठेतील ए टू झेड या दुकानाला रात्री नऊच्या सुमारास आग लागली. यामुळे शेजारील एका कपड्याच्या दुकानातही आगीचे लोळ पोहोचले.ए टू झेड या दुकानात टोपी,बेल्ट,रुमाल,कपडे असे विक्रीचे साहित्य होते. या सर्व साहित्याने पेट घेतल्याने आगीने अल्पावधीत रौद्र रूप धारण केले.
हे दुकान लाकडी पाटाईच्या छताच्या घरात असल्याने आग झपाट्याने पसरली. सटाणा नगर परिषदेच्या अग्निशमन दलास घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुरुवातीला बंबाने तीन फेऱ्या करून आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. यादरम्यान स्थानिक रहिवाशांनीही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
हेही वाचा 

परभणी: दस्तापूर-लोहगाव येथील पुलाला दुचाकी धडकून ममदापूरचा तरुण गंभीर जखमी
कोल्हापूर : तळसंदेत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; महिला, ज्येष्ठ नागरिक आणि जनावरांनवर हल्ला

Latest Marathi News नाशिक : सटाणा शहरातील दोन दुकानांना आग Brought to You By : Bharat Live News Media.