दिल्लीची चेन्नईविरूद्ध धडाकेबाज सुरूवात
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : चेन्नईविरूद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात दिल्लीने संघात दोन बदल केले आहेत. कुलदीप यादव आणि रिकी भुईच्या जागी पृथ्वी शॉ आणि इशांत शर्माला संधी मिळाली आहे. तर सामन्यात चेन्नई संघात कोणताही बदल केलेला नाही. हा सामना डॉ वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. (DC vs CSK)
दिल्लीची चेन्नईविरूद्ध धडाकेबाज सुरूवात
चेन्नईविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने डावाला धडाकेबाज सुरूवात केली आहे. यामध्ये डेव्हिड वॉर्नरने 22 बॉलमध्ये 35 धावांची खेळी केली आहे. यामध्ये त्याने 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर पृथ्वी शॉने 15 बॉल 24 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 4 चौकार लगावले.
दोन्ही संघांचे प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.
इम्पॅक्ट प्लेयर : सुमित कुमार, कुमार कुशाग्रा, रसिक दार सलाम, प्रवीण दुबे, जेक फ्रेझर-मॅकगुर्क.
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथिशा पाथिराना, मुस्तफिजुर रहमान.
इम्पॅक्ट प्लेयर : शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, मोईन अली, मिचेल सँटनर.
हेही वाचा :
GT vs SRH : गुजरातचा हैदराबादवर सात गडी राखून विजय
CUET UG 2024 : ‘सीयूईटी यूजी’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली; ५ एप्रिल पर्यंत भरता येणार फॉर्म
केजरीवाल, सोरेन यांच्या सुटकेसह ‘इंडिया’ आघाडीने जाहीर केल्या ५ मागण्या
Latest Marathi News दिल्लीची चेन्नईविरूद्ध धडाकेबाज सुरूवात Brought to You By : Bharat Live News Media.