भंडारा : अखेर धीरेंद्र शास्त्री महाराजांविरोधात गुन्हा दाखल

भंडारा : अखेर धीरेंद्र शास्त्री महाराजांविरोधात गुन्हा दाखल

भंडारा: Bharat Live News Media वृत्तसेवा :  मानव धर्माचे संस्थापक बाबा जुमदेव आणि त्यांच्या सेवकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्यावर अखेर मोहाडी पोलिस ठाण्यात धार्मिक भावना भडकविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Dhirendra Shastri Maharaj
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे धीरेंद्र शास्त्री महाराजांचे प्रवचन सुरू आहे. या कार्यक्र मात धीरेंद्र शास्त्री महाराजांनी बाबा जुमदेव तसेच त्यांच्या सेवकाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर मानव धर्म सेवकांमध्ये प्रचंड असंतोष उसळला.  आज हजारोंच्या संख्येने सेवक मोहाडी येथे दाखल झाले. धीरेंद्र शास्त्री महाराजांनी माफी मागावी व त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशी मागणी सेवकांची होती. Dhirendra Shastri Maharaj
यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सेवकांसोबत झालेल्या चर्चेनंतर मागण्या मान्य केल्याचे आश्वासन दिल्यानंतर हा तणाव निवळला. अखेरीस दुपारनंतर धीरेंद्र शास्त्री महाराजांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, संध्याकाळी ६ च्या सुमारास अनेक सेवकांनी मोहाडी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यात काही सेवक जखमी झाल्याची माहिती आहे.
हेही वाचा 

बाळूमामा भंडारा यात्रेस धार्मिक वातावरणात प्रारंभ
भंडारा-गोंदियात अपक्ष उमेदवारांची गर्दी! २२ उमेदवारांचे अर्ज वैध तर १८ अवैध 
भंडारा- गोंदिया लोकसभा : नाना पटोले लढत नसल्याने डॉ. फुके यांचीही माघार

Latest Marathi News भंडारा : अखेर धीरेंद्र शास्त्री महाराजांविरोधात गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.