IPL GT vs SRH : सनरायझर्सला पहिला धक्का

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रिमिअर लीग (IPL) 2024 हंगामातील १२ वा सामना आज ( दि. ३१ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. यंदा आयपीएलमध्‍ये गुजरात आणि हैदराबाद यांनी प्रत्येकी दोन सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून एक पराभव पत्करावा लागला आहे. या … The post IPL GT vs SRH : सनरायझर्सला पहिला धक्का appeared first on पुढारी.

IPL GT vs SRH : सनरायझर्सला पहिला धक्का

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : इंडियन प्रिमिअर लीग (IPL) 2024 हंगामातील १२ वा सामना आज ( दि. ३१ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जात आहे. यंदा आयपीएलमध्‍ये गुजरात आणि हैदराबाद यांनी प्रत्येकी दोन सामने खेळले असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून एक पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
डावातील पहिली सहा षटकांमध्‍ये ( पॉवरप्ले) हैदराबादने १ गडी गमावत ५६ धावा केल्‍या आहेत.
सनरायझर्सला पहिला धक्का
सनरायझर्स हैदराबादला पहिला धक्का पाचव्या षटकात 34 धावांवर बसला. मयंक अग्रवालला अजमतुल्ला उमरझाईने दर्शन नळकांडेच्या हाती झेलबाद केले. 17 चेंडूत 16 धावा करून तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. सध्या अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड क्रीजवर आहेत.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी गुजरातचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजी केली असती. शुभमनने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनच्या जागी चायनामन स्पिनर नूर अहमद तर साई किशोरच्या जागी दर्शन नळकांडे यांना संधी देण्‍यात आली आहे.
गुजरात टायटन्स संघ : शुभमन गिल (कर्णधार), ऋद्धिमान शाह (यष्टीरक्षक), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, दर्शन नळकांडे, उमेश यादव, मोहित शर्मा. प्रभावशाली खेळाडू: साई सुदर्शन, साई किशोर, शरथ बीआर, मानव सुथार, अभिनव मनोहर.
सनरायझर्स हैदराबादः मयंक अग्रवाल, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट. प्रभावशाली खेळाडू: उमरान मलिक, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव.

Latest Marathi News IPL GT vs SRH : सनरायझर्सला पहिला धक्का Brought to You By : Bharat Live News Media.