मलायका अरोरा- अरबाजची पत्नी शुरा पहिल्यांदाच आमने-सामने

मलायका अरोरा- अरबाजची पत्नी शुरा पहिल्यांदाच आमने-सामने

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा ( Malaika Arora ) यांच्या घटस्फोटाला बरीच वर्ष झाली आहेत. त्यानंतर काही महिन्यापूर्वी अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरा खानसोबत लग्नगाठ बांधली.लग्नानंतर अनेक ठिकाणी दोघांना स्पॉटही करण्यात आले. पण आता घटस्फोटानंतर पहिल्यांदा खान कुटुंबाला मलायका आणि तिच्या आईसोबत स्पॉट केले आहे. सध्या खान -अरोरा कुटुंबीयांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. सध्या त्याची चर्चा रंगली आहे.
संबंधित बातम्या 

Priyanka Chopra-Nick Jonas : मनारा चोप्राच्या वाढदिवसाला प्रियांका हॉट व्हाईट ड्रेसमध्ये
ShahRukh Khan : अनन्या पांडे शाहरूख खानची लकी चार्म
Crew Box Office Collection : तब्बू, करिना कपूर, क्रितीच्या ‘क्रू’ दोन दिवसांत १८ कोटींच्या घरात

अरबाजने दुसरे लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच मलायका ( Malaika Arora ) आणि शुरा आमने -सामने आल्या. तर व्हिडीओमध्ये अरबाज आणि शुराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
एकमेकांचा हातात घालून चालताना दोघे स्पॉट झाले. तर एका व्हिडीओत सलीम खान आणि मलायकाची आई एकाच कारमध्ये दिसले. आता व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. अनेकांना दोन्ही कुटुबीयांमधील नाते आवडलं आहे, तर अनेकांनी मात्र त्यांना ट्रोलही केले आहे.
Latest Marathi News मलायका अरोरा- अरबाजची पत्नी शुरा पहिल्यांदाच आमने-सामने Brought to You By : Bharat Live News Media.