पुणे: बोरी खुर्द येथे उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे बछडे

पुणे: बोरी खुर्द येथे उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे बछडे

नारायणगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा: जुन्नर तालुक्यातील बोरी खुर्द येथील शेतकरी गोविंद सीताराम शेटे यांच्या उसाची तोडणी सुरु असताना बिबट्याचे तीन बछडे आज (दि.३१) आढळून आली. ही माहिती ओतूर विभागाचे वन क्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली.
ते म्हणाले की, बोरी येथील गोविंद सीताराम शेटे यांच्या उसाची तोडणी मजूर करीत असताना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तीन बिबट्याची पिल्लं आढळून आली. उसाच्या सरीतच बिबट्याची पिल्ले आढळल्याने ऊस तोडणी मजूर घाबरून गेले व बाजूला पळाले. त्यांनी या बाबतची माहिती तात्काळ ऊस मालकांना कळविली.
वन विभागालाही माहिती दिल्यावर त्यांनी तत्काळ वनरक्षक घटनास्थळी पाठविला.
दरम्यान, ऊस तोडणी थांबविण्यात आली असून बिबट्याची पिल्लं सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आली आहेत. रात्री याच ठिकाणी उसाच्या शेतात ती पिल्लं ठेवण्यात येणार आहेत. त्यांची मादी त्यांना पुन्हा घेऊन जाऊ शकेल, असे वन क्षेत्रपाल वैभव काकडे यांनी सांगितले.
हेही वाचा 

पुणे: पिंपळवंडी येथे बिबट्यांच्या हल्ल्यात तीन शेळ्या मृत्यूमुखी
नाशिक, मुंबई, पुणे नंतर आता ड्रग्ज तस्करीचे सिंडिकेट सांगली!
पुणेकरांनो काळजी घ्या ! शहराने गाठली तापमानाची ‘चाळीशी’!

Latest Marathi News पुणे: बोरी खुर्द येथे उसाच्या शेतात आढळले बिबट्याचे बछडे Brought to You By : Bharat Live News Media.