‘मॅचफिक्सिंग’सारखी भाजपने लोकसभा निवडणूक फिक्स केली : राहुल गांधी

‘मॅचफिक्सिंग’सारखी भाजपने लोकसभा निवडणूक फिक्स केली : राहुल गांधी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीसाठी पंच पंतप्रधान मोदी यांनी निवडले आहेत. मॅच सुरू होण्यापूर्वीच दोन खेळाडूंना अटक केली आहे. सरकारचा मॅचफिक्सिंगसारखे निवडणूक फिक्स करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, मॅचफिक्सिंग जिंकली, तर संविधान हरेल, त्यामुळे तुम्ही मॅचफिक्सिंगला बळी पडू नका, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. Rahul Gandhi on BJP
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीच्या वतीने आज (दि. ३१) महारॅली आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. तपास संस्थांचा वापर विरोधकांविरोधात केला जात आहे. जर लोक निवडणुकीत ईव्हीएम नसेल, तर भाजपला १८० जागाही मिळणार नाहीत, असा दावाही गांधी यांनी यावेळी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना केलेली अटक हा लोकशाहीवरील हल्ला आहे, असेही गांधी म्हणाले. Rahul Gandhi on BJP
ते पुढे म्हणाले की, मीडियावर दबाव आणला जात आहे. नेत्यांना धमकी दिली जात आहे पैशांची वापर करून सरकार पाडली जात आहेत. पण तुम्ही भारताचा आवाज दाबू शकत नाही. ऐन निवडणुकीत काँग्रेसची बँक खाती गोठवली आहेत. त्यामुळे प्रचारासाठी पैसे नाहीत, पोस्टर लावायलाही आमच्याकडे पैसे नाहीत. देशाला धमकावून सरकार चालवलं जाऊ शकत नाही. भ्रष्टाचाराला संपविण्यासाठी इंडिया आघाडी लढत आहे. संविधान वाचविण्यासाठी आमची लढाई सुरू आहे.

#WATCH | Delhi: During the INDIA alliance rally at Ramlila Maidan, Congress MP Rahul Gandhi says, “…Without EVMs, match-fixing, social media, and pressurising the press, they cannot win more than 180 seats.” pic.twitter.com/SnVc3T0mYg
— ANI (@ANI) March 31, 2024

हेही वाचा 

INDIA alliance rally: ‘चला, स्वप्नातला भारत घडवू या’ ; कोठडीतून केजरीवालांचा संदेश, पत्नीने वाचून दाखवले पत्र
INDIA alliance rally : देशात एका व्यक्तीचे, एका पक्षाचे सरकार धोकादायक : उद्धव ठाकरे
Russia-Ukraine War : भीषण हल्‍ल्‍यांनी युक्रेन पुन्‍हा हादरला, रशियाने रात्रभर डागली क्षेपणास्‍त्रे, ड्रोन हल्‍लेही

 
Latest Marathi News ‘मॅचफिक्सिंग’सारखी भाजपने लोकसभा निवडणूक फिक्स केली : राहुल गांधी Brought to You By : Bharat Live News Media.