रोहित आऊट झाल्यानंतरची मस्करी जीवावर बेतली

शिगणापूर; पुढारी वृत्तसेवा : आयपीएलमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आऊट झाल्यानंतर आनंद व्यक्त करणाऱ्या चेन्नईच्या चाहत्याचा मुंबईच्या दोन चाहत्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथे बुधवारी (दि.२७) रात्री टीव्हीवरील आयपीएल क्रिकेट सामना बघताना चेष्टा मस्करीतून झालेल्या भांडणातून मारहाणीची घटना घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या बंडोपंत बापू तिबिले (वय ६७) यांचा शनिवारी (दि.३०) … The post रोहित आऊट झाल्यानंतरची मस्करी जीवावर बेतली appeared first on पुढारी.

रोहित आऊट झाल्यानंतरची मस्करी जीवावर बेतली

शिगणापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : आयपीएलमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आऊट झाल्यानंतर आनंद व्यक्त करणाऱ्या चेन्नईच्या चाहत्याचा मुंबईच्या दोन चाहत्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथे बुधवारी (दि.२७) रात्री टीव्हीवरील आयपीएल क्रिकेट सामना बघताना चेष्टा मस्करीतून झालेल्या भांडणातून मारहाणीची घटना घडली होती. यात गंभीर जखमी झालेल्या बंडोपंत बापू तिबिले (वय ६७) यांचा शनिवारी (दि.३०) रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. (IPL 2024)
हणमंतवाडीत शिवाजी गायकवाड यांच्या घरी बुधवारी रात्री दहाच्या दरम्यान आयपीएल क्रिकेटचा सामना गल्लीतील लोक बघत असताना बंडू तीबिले व बळी महादेव झांजगे यांच्यात चेष्टा मस्करी सुरू झाली. त्याचे रूपांतर बाहेर आल्यानंतर भांडणात झाले. बळी झांजगे व त्यांचा पुतण्या सागर सदाशिव झांजगे यांनी केलेल्या मारहाणीत बंडोपंत तिबिले गंभीर जखमी झाले होते. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. गेले तीन दिवस उपचार सुरू होते. त्यांच्या कान व नाकान रक्तप्रवाह थांबत नव्हता. आज त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. गावात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. (IPL 2024)
हेही वाचा : 

वेशांतरांमुळे धुळीला मिळाला ड्रग्ज निर्मिती तस्करीचा बाजार !
दुचाकीचे हप्ते न भरल्याच्या वादातून गुंड तडाखेचा खून
इरळी ड्रग्ज तस्करी प्रकरण : नवी मुंबईतून 3.46 कोटी जप्त

Latest Marathi News रोहित आऊट झाल्यानंतरची मस्करी जीवावर बेतली Brought to You By : Bharat Live News Media.