मुनगंटीवार ३३ वर्षांनी लोकसभा आखाड्यात

चंद्रपूर : राजू येरणे राज्याच्या राजकारणातील भाजपचे हेवीवेट नेते, पालकमंत्री पदापासून अर्थमंत्री पदापर्यत अनेक पदे भूषविलेले, संघाशी जवळीक आणि प्रसंगी मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले सुधीर मुनगंटीवार 33 वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्रपूरला लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. चंद्रपूर-वणी-आर्णी अशा विस्तीर्ण लोकसभा मतदार संघात भाजपने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या जागी मुनगंटीवार यांना संसदेत … The post मुनगंटीवार ३३ वर्षांनी लोकसभा आखाड्यात appeared first on पुढारी.

मुनगंटीवार ३३ वर्षांनी लोकसभा आखाड्यात

चंद्रपूर : राजू येरणे

राज्याच्या राजकारणातील भाजपचे हेवीवेट नेते, पालकमंत्री पदापासून अर्थमंत्री पदापर्यत अनेक पदे भूषविलेले, संघाशी जवळीक आणि प्रसंगी मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले सुधीर मुनगंटीवार 33 वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्रपूरला लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. चंद्रपूर-वणी-आर्णी अशा विस्तीर्ण लोकसभा मतदार संघात भाजपने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या जागी मुनगंटीवार यांना संसदेत जाण्याची संधी दिली आहे. (Lok Sabha Election 2024)
सुधीर मुनंगटीवार यांचा थेट मुकाबला गेल्यावेळी राज्यात काँग्रेसला एकमेव विजय देणारे दिवंगत खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी आहे. राज्याच्या राजकारणातील ही काट्याची टक्कर होणार आहे. चंद्रपूर लोकसभेसाठी माजी खासदार हंसराज अहिर यांच्यासमवेत ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे, डॉ. गजेंद्र आसूटकर (यवतमाळ) इच्छुक होते. मात्र, पक्षाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संधी दिली. सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी दोन वेळा (1989 व 1991) चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढविली, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदा मात्र चित्र पालटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 400 पारचा नारा भाजपने दिला आहे. या पार्श्वभूमीवर ही जागा भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची समजली जात आहे. राज्याच्या राजकारणात, विधानसभेत सहा वेळा निवडून आलेले दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार हे 1995 पासून आमदार आहेत. वन, सांस्कृतिक ते अर्थमंत्री पदापर्यंत त्यांनी काम केले आहे. राजकीय, सामाजिक व प्रशासकीय कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. सूक्ष्म नियोजनशैली व सर्वमान्य नेतृत्व या पार्श्वभूमीवर भाजपने मुनगंटीवारांच्या गळ्यात उमेदवारी टाकली. खरेतर वारंवार मुनगंटीवारांनी राज्याच्या राजकारणातच आपल्याला रस असल्याचे सांगून लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला. परंतु, भाजपने त्यांची उमेदवारी फायनल केली होती. 1989 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढविली त्यावेळी त्यांना 1 लाख 93 हजार 397 मते मिळाली होती. काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे विजयी झाले. 1991 मध्ये गडचिरोली जिल्ह्याचा चंद्रपूर लोकसभेत समावेश झाल्यावर मुनगंटीवार दुसर्‍यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना 1 लाख 23 हजार 122 मते मिळाली व ते तिसर्‍या क्रमांकावर राहिले. त्यावेळीही काँग्रेसचे शांताराम पोटदुखे 2 लाख 12 हजार 948 मते मिळवून संसदेत पोहोचले. दुसर्‍या क्रमांकावर माजी सभापती व जनता दलाचे मोरेश्वर टेम्भूर्डे यांनी 1 लाख 25 हजार 251 मते घेतली. 2019 मध्ये मोदी लाटेत राज्यातील, देशातील अनेक नेते सहज विजयी होताना ऐनवेळी वरोरा मतदार संघात शिवसेनेकडून आमदार म्हणून निवडून आलेले बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांनी मोदी लाटेला छेद देत या चंद्रपूर-वणी‘आर्णी लोकसभा क्षेत्रातून 44 हजार मतांनी विजयश्री खेचून आणली आणि राज्यात काँग्रेसचे नाक वाचले. विशेष म्हणजे त्यांनी शिवसेना आमदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसकडून ही निवडणूक लढविली होती. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा त्यांनी दारुण पराभव केला. हा पराभव भाजपला जिव्हारी लागली. कुणबी, ओबीसी प्राबल्य असलेल्या या मतदार संघात वंचित उमेदवार तिसर्‍या नंबरवर राहिले. त्यांना 1 लाख 16 हजार मते मिळाली. (Lok Sabha Election 2024)
पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना आता काँग्रेसने अखेरच्या क्षणी विचारपूर्वक उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी यांच्यासाठी दावेदारीने हा मतदारसंघ चर्चेत आला. त्यामुळे काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. वडेट्टीवार लोकसभेसाठी आग्रही असल्यामुळे प्रतिभा धानोरकर यांना दिल्लीत जाऊन जोर लावावा लागला. प्रतिभा यांना 24 तारेखलाच उमेदवारी मिळाली. सामाजिक समीकरण आणि पतीच्या निधनानंतर त्यांना सहानुभूती आहे. ओबीसी आणि कुणबी मते निर्णायक ठरणार आहेत. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांचे प्रश्न यावेळी सर्वसामान्यांमध्ये चर्चेत आहेत. मुनगंटीवार यांची जमेची बाजू म्हणजे त्यांनी बल्लापूर विधानसभा मतदार संघात तीन वेळा, तर चंद्रपूर विधानसभा मतदार संघात तीन वेळा विजय मिळविला. उत्तम वक्ता, मंत्रिपदाचा प्रदीर्घ अनुभव, प्रशासनावर पकड, जनसंपर्क चांगला आहे. पालकमंत्री म्हणून बल्लारपूर, पोंभूर्णा, मूल या ठिकाणी त्यांनी कामे केली. त्यामुळेच मोदी यांच्या देश विकासाच्या आवाहनाला की सहानुभूतीच्या भावनिक आवाहनाला मतदार साथ देतात, यावर सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या थेट लढतीचा निकाल लागणार आहे. (Lok Sabha Election 2024)
हेही वाचा : 

लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान
अभिनेता सनी देओलचे तिकीट भाजपने कापले
इंदिरा सरकारने कठोरपणे ‘कचाथीवू’ श्रीलंकेला दिले; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Latest Marathi News मुनगंटीवार ३३ वर्षांनी लोकसभा आखाड्यात Brought to You By : Bharat Live News Media.