IPLचा नवा स्पीड स्टार मयंक यादव कोण आहे?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mayank Yadav IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात शनिवारी एक रोमांचक सामना खेळला गेला. 21 वर्षीय मयंक यादव या सामन्यात लखनौच्या विजयाचा हिरो ठरला. या युवा वेगवान गोलंदाजाने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच 156 किमी प्रति तास या वेगाने चेंडू टाकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा … The post IPLचा नवा स्पीड स्टार मयंक यादव कोण आहे? appeared first on पुढारी.

IPLचा नवा स्पीड स्टार मयंक यादव कोण आहे?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Mayank Yadav IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात शनिवारी एक रोमांचक सामना खेळला गेला. 21 वर्षीय मयंक यादव या सामन्यात लखनौच्या विजयाचा हिरो ठरला. या युवा वेगवान गोलंदाजाने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच 156 किमी प्रति तास या वेगाने चेंडू टाकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा IPL 2024 मधील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे.
लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जचा 21 धावांनी पराभव करत आयपीएल 2024 मध्ये पहिला विजय नोंदवला. या विजयात गोलंदाज मयंकने मोठे योगदान दिले. सामन्यात पंजाबची एकवेळची धावसंख्या बिनबाद 102 धावा होती, मात्र मयंकच्या तुफानी गोलंदाजीने सामन्याला वळण दिले. त्याच्या भेदक मा-यापुढे प्रतिस्पर्धी पंजाबची फलंदाजी खिळखिळी झाली.
मयंक यादवने 4 षटकात 27 धावा देत तीन बळी घेतले. त्याचा हा स्पेल एलएसजीसाठी निर्णायक ठरला आणि संघाने 21 धावांनी विजय मिळवला. मयंकने जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन आणि जितेश शर्मा यांना आपल्या वेगवान माऱ्याने गारद केले.
मयंक यादवने पहिल्या षटकात 10 धावा दिल्या. पण यानंतर त्याने आपल्या दुसऱ्याच षटकात जोरदार पुनरागमन केले आणि एका शॉर्ट चेंडूवर जॉनी बेअरस्टोला बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकात प्रभसिमरन सिंगही मयंकच्या वेगाने चकित झाला आणि मिडऑनला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हाती झेलबाद झाला. आपल्या शेवटच्या षटकात मयंकने जितेश शर्मालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मयंकला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले.
मयंकने आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्यचकित केले. पंजाब किंग्जच्या डावाच्या 12व्या षटकात, त्याने शिखर धवनला 155.8 किमी प्रति तास वेगाने चेंडू टाकला. आयपीएलच्या चालू हंगामातील हा सर्वात वेगवान चेंडू ठरला. या सामन्यादरम्यान मयंकने 150 किमी प्रति तासाचा अडथळा अनेकदा पार केला. त्याच्या बॉलिंगमध्ये केवळ वेगच नाही, तर लेन्थ-लाईनही अतिशय अचूक होती.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान एलएसजीने 199 धावा ठोकल्या. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाने 9 षटकांत एकही विकेट न गमावता 88 धावा केल्या. पीबीकेएस या लक्ष्याचा सहज पाठलाग करेल असे वाटत होते. पण त्यानंतर 21 वर्षीय मयंक यादवचा प्रवेश करण्यात आलेल्या युवा वेगवान गोलंदाजाने पहिल्याच षटकात आपल्या वेगाने खळबळ उडवून दिली. त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिला चेंडू 147.1kph च्या वेगाने टाकला, तर तिसऱ्या चेंडूवर त्याने 150kph च्या स्पीडलाही स्पर्श केला. पहिल्याच षटकात त्याला यश मिळाले नसले तरी त्याने आपल्या वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कोण आहे मयंक यादव?
मयंक यादवचा जन्म 17 जून 2002 रोजी दिल्लीत झाला. मयंक दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. मयंकने दिल्लीच्या सोनेट क्लबमधून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे. ही तीच अकादमी आहे जिथून भारतीय यष्टिरक्षक ऋषभ पंत, शिखर धवन आणि आशिष नेहरासारखे महान क्रिकेटपटू उदयास आले आहेत. मयंकने त्याच्या देशांतर्गत कारकिर्दीत आतापर्यंत एक प्रथम श्रेणी सामना, 17 लिस्ट-ए आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 17 लिस्ट ए मॅचमध्ये 34 तर 10 टी-20 मॅचमध्ये 12 विकेट घेतल्या आहेत.
आयपीएल लिलावात किती रक्कम मिळाली?
लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2022 च्या लिलावादरम्यान मयंक यादवचा त्यांच्या संघात समावेश केला. मयंक 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता आणि एलएसजीने त्याला मूळ किंमतीवरच खरेदी केले. यापूर्वी तो दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला होता. त्यावेळी त्याच्या जागी अर्पित गुलेलियाचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी मयंकने या मोसमात पुनरागमन केले आणि पदार्पणाच्या सामन्यातच तो स्टार झाला.
मयंक सामान्य कुटुंबातील
मयंक यादव हा दिल्लीतील एका सामान्य कुटुंबातून आला आहे. वृत्तानुसार, लॉकडाऊन दरम्यान त्याच्या वडिलांचा व्यवसाय कोलमडला होता आणि त्यांच्याकडे स्पाइक खरेदी करण्यासाठी देखील पैसे नव्हते.
मयंक यादवचे वेगवान चेंडो (किमी प्रति तास)
पहिले षटक : 147, 146, 150, 141, 149, 147
दुसरे ओव्हर- 156, 150, 142, 144 (w), 153, 149
तिसरा षटक- 152, 150, 147 (w), 146, 144, 143
चौथे षटक- 153, 154, 149, 142 (w), 152, 148

𝗦𝗽𝗲𝗲𝗱𝗼𝗺𝗲𝘁𝗲𝗿 goes 🔥
𝟭𝟱𝟱.𝟴 𝗸𝗺𝘀/𝗵𝗿 by Mayank Yadav 🥵
Relishing the raw and exciting pace of the debutant who now has 2️⃣ wickets to his name 🫡#PBKS require 71 from 36 delivers
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL |… pic.twitter.com/rELovBTYMz
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2024

Latest Marathi News IPLचा नवा स्पीड स्टार मयंक यादव कोण आहे? Brought to You By : Bharat Live News Media.