गोंदिया : कत्तलखान्याकडे जाणार्‍या २१ गोवंशांची सुटका; रावणवाडी पोलिसांची कारवाई 

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : रावणवाडी पोलिसांनी तालुक्यातील चंगेरा शिवारात 29 मार्च रोजी सापळा रचून कत्तलखान्याकडे जाणार्‍या 21 गोवंशांची सुटका केली. याप्रकरणी २ लक्ष १० हजाराचा मुद्देमाल हस्तगत जप्त करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांवर लक्ष ठेवून विशेष कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. यातंर्गत रावणवाडी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या … The post गोंदिया : कत्तलखान्याकडे जाणार्‍या २१ गोवंशांची सुटका; रावणवाडी पोलिसांची कारवाई  appeared first on पुढारी.

गोंदिया : कत्तलखान्याकडे जाणार्‍या २१ गोवंशांची सुटका; रावणवाडी पोलिसांची कारवाई 

गोंदिया, Bharat Live News Media वृत्तसेवा : रावणवाडी पोलिसांनी तालुक्यातील चंगेरा शिवारात 29 मार्च रोजी सापळा रचून कत्तलखान्याकडे जाणार्‍या 21 गोवंशांची सुटका केली. याप्रकरणी २ लक्ष १० हजाराचा मुद्देमाल हस्तगत जप्त करण्यात आला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांवर लक्ष ठेवून विशेष कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. यातंर्गत रावणवाडी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस पथकाने चंगेरा शिवारात सापळा रचून एमएच 37, टी 3114 क्रमांकाचा ट्रकची पाहणी केली असता 2 लक्ष 10 हजार रुपये किमतीचे 21 गोवंश कोंबून कत्तलखान्याकडे घेऊन जात असल्याचे आढळल्याने पोलिसांनी ट्रक व गोवंश असा एकूण १४ लक्ष १० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी गोवंश मालक फिरोज खान रशीद खान (52, रा. सेलू), राजीव शफी कनुज (27 रा. बाजारटोला) व जितेंद्र हरीलाल अंबुले (29 रा. बाजारटोला) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ताब्यात घेतलेले गोवंश कोरणी येथील विठ्ठल रुख्मिणी गोशाळेत पाठविण्यात आले.
Latest Marathi News गोंदिया : कत्तलखान्याकडे जाणार्‍या २१ गोवंशांची सुटका; रावणवाडी पोलिसांची कारवाई  Brought to You By : Bharat Live News Media.