आ. शिवेंद्रराजेंना खा. उदयनराजेंकडून झप्पी
सातारा, Bharat Live News Media वृत्तसेवा : खा. उदयनराजे भोसले यांनी सुरूचि या आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवशी मिठी मारून जादू की झप्पी दिली. शिवेंद्रराजेंनी सातारा जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, अशा भावना व्यक्त केल्या तर उदयनराजेंच्या मिठीमुळे मला दहा हत्तींचे बळ मिळाले आहे, अशा शब्दांत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना ‘बर्थडे बॉय’ म्हणत बुके दिला. दोघांचे फोटो सेशन सुरू असतानाच पत्रकारांनी महाराज जादूची झप्पी द्या, असा उदयनराजेंकडे आग्रह केल्यानंतर उदयनराजेंनी खांद्यावर टाकलेल्या हाताकडे लक्ष वेधत आ. शिवेंद्रराजे म्हणाले, ‘हे काय.. त्यांनी झप्पी मारलीय.. आणखी झप्पी मारली तर मी बाऊन्स होईन’, अशी कोटी करताच हशा पिकला.
आ. शिवेंद्रराजेंनी फार मोठं व्हावं. त्यांना दीर्घायुष्य लाभावं. त्यांना परमेश्वराचे प्रेम मिळावे. खूप यश व कीर्ती मिळावी. त्यासाठी मला जे काही करावे लागेल ते करण्याची माझी तयारी आहे. ही भेट राजकीय नाही. त्यांच्यासाठी जे काही करत आलो ते करणार आहे. जे चाललंय ते काळाची गरज आहे, असे उदयनराजे यांनी सांगितले.
आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, खा. उदयनराजे भोसले यांनी वाढदिवसानिमित्त भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत. कौटुंबिक विषय वेगळे आणि राजकीय विषय वेगळे आहेत, हे त्यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे.
Latest Marathi News आ. शिवेंद्रराजेंना खा. उदयनराजेंकडून झप्पी Brought to You By : Bharat Live News Media.