परभणी : पूर्णा येथे सर्वपक्षीय उमेदवारांना घरबंदी: मराठा समाजाचा निर्णय

पूर्णा: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने सगेसोयरे अधिसूचना काढली. परंतु, तशा कायदा पारीत करुन अंमलबजावणी केली नसल्यामुळे पूर्णा तालुक्यातील लक्षावधी मराठा समाज फसवणूक करणाऱ्या  सत्ताधाऱ्यांविरुध्द पेटून उठला आहे. त्यामुळे विविध पक्षांचे राजकीय पुढारी, आमदार, खासदार यांना आता घरबंदी केली आहे. यात आता महिला वर्ग मोठ्या संख्येने उतरला आहे. Parbhani News ” सर्वपक्षीय नेते … The post परभणी : पूर्णा येथे सर्वपक्षीय उमेदवारांना घरबंदी: मराठा समाजाचा निर्णय appeared first on पुढारी.

परभणी : पूर्णा येथे सर्वपक्षीय उमेदवारांना घरबंदी: मराठा समाजाचा निर्णय

आनंद ढोणे

पूर्णा: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने सगेसोयरे अधिसूचना काढली. परंतु, तशा कायदा पारीत करुन अंमलबजावणी केली नसल्यामुळे पूर्णा तालुक्यातील लक्षावधी मराठा समाज फसवणूक करणाऱ्या  सत्ताधाऱ्यांविरुध्द पेटून उठला आहे. त्यामुळे विविध पक्षांचे राजकीय Bharat Live News Media, आमदार, खासदार यांना आता घरबंदी केली आहे. यात आता महिला वर्ग मोठ्या संख्येने उतरला आहे. Parbhani News
” सर्वपक्षीय नेते झाले बहिरे, आमची मागणी सगेसोयरे, सर्वपक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना घरबंदी”, अशा ठळक शब्दांत नमूद केलेले फलक घरावर लावण्यात येणार आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांची चांगलीच कोंडी होणार आहे. तसेच अनेक समस्यांचा सामना करणे, मुश्किल होणार आहे. आपण आजवर अनेकांना मतदान करुन मोठे केले. त्यांनी आपल्यासाठी काहीच केले नाही, आरक्षणावर ब्र शब्द काढला नसल्याने आता मराठा समाज एकवटला आहे. Parbhani News

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी आजपर्यंत दिवंगत मराठा नेते अण्णासाहेब पाटील, दिवंगत अण्णासाहेब जावळे, दिवंगत विनायकराव मेटे आणि आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली हा लढा चालूच आहे. आताच्या लढ्याला नमते घेवून शिंदे सरकारने सगेसोयरे अधिसूचना काढली. पण अंमलबजावणी केली नाही. मराठ्यांच्या कोपराला गुळ लावून फसवणूक केली. त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांसोबत लोकप्रतिनिधींना आधी गावबंदी घातली, आत ती कायम ठेवून लोकसभा निवडणुकीत घरबंदीही केली आहे.
– प्रा. व्यंकटेश काळे, साहेबराव कल्याणकर, नरेश जोगदंड, लक्ष्मणराव शिंदे, ज्ञानोबा कदम, भगवान दुधाटे, मुंजाभाऊ जोगदंड
मराठा समन्वयक, पूर्णा तालुका

हेही वाचा 

परभणी : डॉग तेजाकडून सेलू स्थानकासह रेल्वे गाड्यांची तपासणी
परभणी: मिरखेल- माळटेकडी लोहमार्गावर विद्युत रेल्वेची चाचणी यशस्वी
परभणी: पूर्णा तालुक्यातून अंतरवालीकडे हजारो मराठा बांधव रवाना

Latest Marathi News परभणी : पूर्णा येथे सर्वपक्षीय उमेदवारांना घरबंदी: मराठा समाजाचा निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.