जळगाव: सावदा येथील रखवालदाराच्या खून प्रकरणाचा ४ तासांत छडा, दोघांना अटक

जळगाव: सावदा येथील रखवालदाराच्या खून प्रकरणाचा ४ तासांत छडा, दोघांना अटक

जळगाव, Bharat Live News Media वृत्तसेवा : सावदा शहरातील कोचुर रोडवर रविंद्र बेंडाळे यांच्या शेतातील घरात राहणारा रखवालदार सुभाराम बारेला (रा. आंबळी, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांनी खुनाची कबुली दिली आहे. याप्रकरणी सावदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ४ तासांच्या आत दोघांना आज (दि.३०) अटक केली.
प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत मृत व आरोपी याच्यात झालेल्या भांडणाच्या कारणावरुन आरोपी सुकलाल रतन लोहारे (रा.नेपानगर मध्य प्रदेश) व अर्जुन मुन्ना आवासे (रा. ब-हाणपुर, मध्यप्रदेश) यांनी सुभाराम झोपेत असताना त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून खून केला.
सुभाराम बारेला आज सकाळी कामावर आला नाही, म्हणून शेत मालकाने सुभाराम याची चौकशी केली असता शेतातील घरात त्याच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याचे आढळून आले. त्यावरुन लोकेश बेंडाळे याचे फिर्यादीवरुन सावदा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि जालिंदर पळे व पथकाने धाव घेतली. त्यानंतर आजुबाजुच्या परिसरातील सालगडी म्हणून काम करणाऱ्या सर्व मजुरांची माहिती घेतली.
त्यावरुन दोन सालगडी मालकाकडून सकाळीच रोजंदारीचे पैस घेऊन गेल्याचे समजले. यातील एका शेत मजुराच्या नातेवाईकाकडे शोध घेतला असता नातेवाईक उदळी गावाच्या हद्दीत राहत असल्याचे समजले. त्यावरुन पोलीस पथकाने तेथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप.विभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस स्टेशनचे जालिंदर पळे, अमोल गर्ने, संजय देवरे, विनोद पाटील, यशवंत टहाकळे, देवेंद्र पाटील, विनोद तडवी, प्रकाश जोशी, किरण पाटील यांनी केली.
हेही वाचा 

जळगाव: सावदा येथे रखवालदाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून
Crime News | १७ लाखांचे सोने घेवून बंगाली कारागीर फरार ! जळगावात खळबळ
जळगाव : शिरसोली गावात शिवजयंतीच्या मिरवणुकीवर अज्ञातांकडून दगडफेक

Latest Marathi News जळगाव: सावदा येथील रखवालदाराच्या खून प्रकरणाचा ४ तासांत छडा, दोघांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.