प्रशिक्षणार्थी पोलिसांची प्रकृती बिघडली

प्रशिक्षणार्थी पोलिसांची प्रकृती बिघडली

अकोला; Bharat Live News Media वृत्तसेवा:  पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचाऱ्यांना आरोग्य विषयक त्रास झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२९) घडली. सुमारे १५ पेक्षा अधिक महिला प्रशिक्षणार्थी पोलिसांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामागे सुरू असलेले प्रशिक्षण की वाढता उन्हाळा, खानपान नेमके काय कारण आहे? ते अद्याप कळू शकलेले नाही. (Trainee Police)

अकोला पोलिस प्रशिक्षण केंद्रात राज्यातील विविध जिल्ह्यांतील महिला प्रशिक्षणार्थी पोलिस प्रशिक्षणासाठी प्रवेशित आहेत. यामधील १५ पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी  महिला पोलिसांना मळमळ आणि उलट्या झाल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामधील बहुतांश महिला पोलिसांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर काहींवर किरकोळ प्रमाणात उपचार सुरु आहेत. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. (Trainee Police)
Latest Marathi News प्रशिक्षणार्थी पोलिसांची प्रकृती बिघडली Brought to You By : Bharat Live News Media.