नपुंसक असतानाही लग्न लावून दिले; पतीसह सासरच्या सहा जणांवर गुन्हा

नपुंसक असतानाही लग्न लावून दिले; पतीसह सासरच्या सहा जणांवर गुन्हा

माजलगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : मुलगा नपुंसक असल्याचे माहित असतानाही त्याचे लग्न लावून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने शहर पोलिसात ३० एप्रिल रोजी तक्रार दाखल केली आहे.
पाटोदा तालुक्यातील बेलखंडी येथील गिन्यानदेव माने आणि सुमनबाई माने यांनी २१ एप्रिल २०२२ रोजी आपला मुलगा शिवाजी याचे लग्न पीडित मुलीशी लावून दिले होते. लग्नानंतर वधू मुलीला आपला पती हा नपुंसक असल्याचे समजले. तिने ही बाब सासू-सासरे, नणंद यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. परंतु सासरच्या मंडळींनी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. एवढ्यावरच न थांबता तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला व जीवे मारण्याची धमकी दिली. नवऱ्याकडून सतत छळ होऊ लागल्याने पीडितेने आपल्या माहेरी जाऊन याबाबत आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर तिने माजलगाव शहर पोलीस ठाण्यात पती शिवाजी माने सासरे-गिन्यानदेव, सासू-सुमनबाई, दिर-राम, ननंद-आशा नाईकवाडे, तिचा नवरा दत्तात्रय सर्व रा.स्वराज्य नगर, बीड यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचा : 

परभणी: कावलगाव येथे विवाहितेचा छळ; सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल
संभाजीनगर हादरले! मुलीच्या प्रेमविवाहाला मदत केल्याने बापलेकाला जीपखाली चिरडले, एकाचा मृत्यू
हिंगोली : अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या कारसह १ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त
बीड: खोकरमोह येथे वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले

Latest Marathi News नपुंसक असतानाही लग्न लावून दिले; पतीसह सासरच्या सहा जणांवर गुन्हा Brought to You By : Bharat Live News Media.