जळगाव: सावदा येथे रखवालदाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून
जळगाव, Bharat Live News Media वृत्तसेवा: रावेर तालुक्यातील सावदा येथे कोचुर रोडवरील शेतातील घरात रखवालदाराचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. शोभाराम बारेला उर्फ सुरमा भोपाली (वय ४०, मूळ रा. मध्यप्रदेश) असे खून झालेल्या रखवालदाराचे नाव आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील सावदा येथे कोचुर रोडवर रविंद्र बेंडाळे यांच्या शेतात रखवालदार म्हणून शोभाराम कामाला होते. ते शेतातील घरात राहत होते. शुक्रवारी रात्री अज्ञाताने शोभाराम यांच्या तोंडावर दगडाचे घाव घालून खून केला. तसेच त्याच्या छातीवर मोठा दगडही ठेवला होता.
याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी जळगाव येथून श्वान पथक मागविण्यात आले आहे. पुढील तपास सावदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, देवा पाटील, यशवंत खेळकर करीत आहेत.
हेही वाचा
Crime News | १७ लाखांचे सोने घेवून बंगाली कारागीर फरार ! जळगावात खळबळ
जळगाव, रावेरमध्ये भाजपाचे ‘एकला चलो रे’, तर महायुतीतील पक्षांचे वेट अँड वॉच | Lok Sabha Election 2024
Jalgaon Temperature | जळगाव जिल्हा उन्हाने तापला, सरासरी 44 अंश सेल्सिअस तापमान
Latest Marathi News जळगाव: सावदा येथे रखवालदाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून Brought to You By : Bharat Live News Media.