बंद शौचालयामुळे महिलांची कुचंबणा; शौचालयासह नागरी सुविधा द्या : महिलांची मागणी

महर्षिनगर : पुढारी वृत्तसेवा : इंदिरानगर गुलटेकडी वसाहतीमधील खड्डा परिसरात सार्वजनिक शौचालय अनेक महिन्यांपासून बंद आहे. परिसरात शौचालय नसल्याने तसेच सध्या रमजान महिना सुरू असल्याने शौचालय तत्काळ सुरू करावे, अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे. ड्रेनेज खराब असल्याने सदरचे शौचालय बंद असून, या भागात तात्पुरती सोय म्हणून मोबाईल शौचालय देण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे सहायक … The post बंद शौचालयामुळे महिलांची कुचंबणा; शौचालयासह नागरी सुविधा द्या : महिलांची मागणी appeared first on पुढारी.

बंद शौचालयामुळे महिलांची कुचंबणा; शौचालयासह नागरी सुविधा द्या : महिलांची मागणी

महर्षिनगर : Bharat Live News Media वृत्तसेवा : इंदिरानगर गुलटेकडी वसाहतीमधील खड्डा परिसरात सार्वजनिक शौचालय अनेक महिन्यांपासून बंद आहे. परिसरात शौचालय नसल्याने तसेच सध्या रमजान महिना सुरू असल्याने शौचालय तत्काळ सुरू करावे, अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे. ड्रेनेज खराब असल्याने सदरचे शौचालय बंद असून, या भागात तात्पुरती सोय म्हणून मोबाईल शौचालय देण्यात येईल, अशी माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त प्रदीप आव्हाड यांनी दिली. नागरी सुविधांपासून वंचित असलेला प्रभाग 28 मधील परिसर म्हणजे इंदिरानगर गुलटेकडी वसाहत आहे.
मागील चार टर्मपासून या भागात अनेक नागरी सुविधा नाहीत. सध्या रमजान महिना सुरू आहे. मुस्लिम बांधवांचे उपवास सुरू आहेत. जवळपासच्या परिसरात दुसरे सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे बंद असलेले शौचालय तत्काळ सुरू करावे, अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे. बंद शौचालयासमोर उभे राहून महिलांनी ‘तत्काळ शौचालय सुरू करा; अन्यथा आंदोलन करू’ असा इशारा दिल्याची माहिती सुरैया शेख व महिलांनी दिली.
सदरचे शौचालय ड्रेनेजचे कारण पुढे करून अनेक महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहे. रस्ते, पाणी या समस्या कायमस्वरूपी आहेतच, त्यातच शौचालय बंदची नवी समस्या पुढे आली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव राहतात. किमान धार्मिक उपवास असल्याने तरी महापालिका प्रशासनाने तात्पुरती सोय करावी, अशी मागणी सलीम सय्यद यांनी अधिकार्‍यांकडे केली आहे.
या वेळी माधवी नाईक, सुरैया शेख, लता ओव्हाळ, सुमन जाधव व महिला उपस्थित होत्या. या वेळी महिलांनी प्रशासनासह स्थानिक नाकर्त्या लोकप्रतिनिधींचा निषेध व्यक्त केला आहे. लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते निवडणुका आल्या की वस्तीत
येतात, एरवी समस्या असल्या की कोणीही येत नाही. समस्यांचे फोटो पाठवा; मग बघतो, असे लोकप्रतिनिधी सांगतात, असे सांगून त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
हेही वाचा

5 पाच हजार द्या, उतारा घ्या; लाच घेताना ग्रामसेवकाला पकडले
Crime News : मुंबईच्या चोरट्यांचा पुण्यात घरफोडीचा धंदा..
सेवा विकास बँके गैरव्यवहार प्रकरण : रोझरीचा संचालक विनय अर्‍हानाला बेड्या

Latest Marathi News बंद शौचालयामुळे महिलांची कुचंबणा; शौचालयासह नागरी सुविधा द्या : महिलांची मागणी Brought to You By : Bharat Live News Media.