‘या’ बुडालेल्या जहाजावर होते अब्जावधींचे सोने

‘या’ बुडालेल्या जहाजावर होते अब्जावधींचे सोने

लंडनः वेगवेगळ्या कारणांमुळे जुन्या काळापासूनच अनेक जहाजे समुद्रात बुडालेली आहेत. त्यापैकी काही जहाजांवर मौल्यवान वस्तूही होत्या. सन 1641 मध्ये ‘मर्चंट रॉयल’ नावाचे एक जहाजही समुद्रात बुडाले होते. 2019 मध्ये त्याचा शोध लावण्यात आला. त्यावेळी जहाजाचा वरचा भाग सापडला होता, खालचा भाग अद्यापही सापडलेला नाही. या जहाजावर अब्जावधी रुपयांचे सोने होते व त्यामुळे त्याचा शोध घेतला जात आहे. (Merchant Royal Ship)
जर जहाजाचा हा भाग सापडला तर कदाचित कोलंबिया देशाला त्याचा मोठाच आर्थिक लाभ मिळू शकतो. या जहाजाला शोधण्याचे काम ‘मल्टीबीम सर्व्हिसेज’ ही कंपनी करणार आहे. यासाठी सोनार टेक्निकचा वापर केला जाणार आहे. या जहाजाच्या अवशेषांमध्ये अब्जावधी रुपयांचे सोने-चांदी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थात कंपनीसाठी हे काम तितकेसे सोपे नाही. त्यांच्यासाठीही हे एक मोठेच आव्हान आहे. (Merchant Royal Ship)
कंपनीचे प्रमुख निगेल हॉज यांनी सांगितले की, तिथे जहाजांचे हजारो तुकडे आहेत आणि मर्चंट रॉयलचे अवशेष त्यामध्येच आहेत. त्यामुळे तेथील बराच मोठा ढिगारा उपसावा लागणार आहे. हे काम इतके सोपे असते तर आतापर्यंत सोन्याचा शोध लागला असता! मर्चंट रॉयल जहाजाला आपल्या खजिन्यामुळे ‘एल डोरॅडो ऑफ द सीज’ असे नाव देण्यात आले होते. हे जहाज 23 सप्टेंबर 1641 मध्ये दुर्घटनाग्रस्त झाले होते. बुडण्याआधी जहाज डागडुजीसाठी मेक्सिको आणि कॅरेबियन बेटांवरून परतीच्या प्रवासात अतिरिक्त माल घेण्यासाठी कँडीज स्पॅनिश बंदरावर थांबले होते. (Merchant Royal Ship)
Latest Marathi News ‘या’ बुडालेल्या जहाजावर होते अब्जावधींचे सोने Brought to You By : Bharat Live News Media.