छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये मोठी कारवाई, चकमकीत ६ नक्षलवादी ठार

पुढारी ऑनलाईन : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा जवानांनी मोठी कारवाई केली. येथील चिकुरबत्ती-पुसबाकाजवळील जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका महिला कॅडरसह सहा नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईत डीआरजी, सीआरपीएफ २२९ आणि कोब्राच्या पथकांचा सहभाग होता. (Chhattisgarh Encounter) सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना बासागुडा … The post छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये मोठी कारवाई, चकमकीत ६ नक्षलवादी ठार appeared first on पुढारी.

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये मोठी कारवाई, चकमकीत ६ नक्षलवादी ठार

Bharat Live News Media ऑनलाईन : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा जवानांनी मोठी कारवाई केली. येथील चिकुरबत्ती-पुसबाकाजवळील जंगल परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका महिला कॅडरसह सहा नक्षलवादी ठार झाले, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या कारवाईत डीआरजी, सीआरपीएफ २२९ आणि कोब्राच्या पथकांचा सहभाग होता. (Chhattisgarh Encounter)
सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना बासागुडा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत चिकुरबत्ती आणि पुसबाका गावांच्या जंगलात गोळीबार सुरु झाला, असे पोलिस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि त्याची विशेष बटालियन कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ॲक्शन) यांच्याशी संबंधित सुरक्षा जवान या कारवाईत सहभागी झाले होते, असे ते म्हणाले.
“ही चकमक थांबल्यानंतर घटनास्थळावर एका महिलेसह सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.” या भागात अद्याप शोधमोहीम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
बिजापूर जिल्ह्यातील बस्तर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यापूर्वी सुरक्षा दलांनी नक्षल्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. (Chhattisgarh Encounter)

Chhattisgarh | Bodies of six naxals recovered following encounter between security forces and naxals in the forest area near Chikurbatti-Pusbaka in Bijapur district. DRG, CRPF 229, CoBRA teams were involved in the operation https://t.co/iw9zKzTCfS pic.twitter.com/sRzrQKIztN
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 27, 2024

हे ही वाचा :
 
Latest Marathi News छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये मोठी कारवाई, चकमकीत ६ नक्षलवादी ठार Brought to You By : Bharat Live News Media.