बीड : न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या आरोपींची पोलिसांची धरपकड; एकाच दिवशी ११ जण ताब्यात
आष्टी; Bharat Live News Media वृत्तसेवा : अंभोरा ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या गुन्ह्यात असलेले आरोपी हे न्यायालयाने ठरवून दिलेल्या तारखेला हजर राहत नसल्याचे समोर आले. न्यायालयाने अटक वाॅरन्ट काढताच अंभोरा पोलिसांनी निवडणुकीच्या तोंडावर एकाच दिवशी ११ आरोपीची धरपकड करत पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचे कारवाईतून दाखवून दिले आहे.
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या गुन्ह्यात न्यायालयलीन तारखेला हजर न राहता गैरहजर राहत विविध गावातील अकरा आरोपीना न्यायालयाने NBW वॉरंट बजावले असल्याने पाहिजे मधील आरोपींचा मंगळवारी ॲक्शन मोडवर येत अंभोरा पोलिसांनी शोध घेणे सुरू करत अकरा जणाची धरपकड करण्यात आली. न्यायालयात हजर करण्याची प्रकिया अंभोरा पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंभोरा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके पोलिस उपनिरीक्षक सातव,पोलीस हवालदार मनोज खंडागळे, बाबुराव तांदळे, भरत माने, पोलीस नाईक प्रशांत कांबळे, अमोल ढवळे, पोलीस अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ, सतीश पैठणे, सुदाम पोकळे, बाळू जगदाळे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
Latest Marathi News बीड : न्यायालयात गैरहजर राहणाऱ्या आरोपींची पोलिसांची धरपकड; एकाच दिवशी ११ जण ताब्यात Brought to You By : Bharat Live News Media.