कोल्हापूर : उदगाव येथे ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना भीषण आग

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : उदगांव (ता.शिरोळ) येथील बिरोबा मंदिरासमोर असलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना मंगळवारी (दि.२६) रात्री साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. यात सुमारे पाच झोपड्यांसह प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. यात एक शेळी गंभीर भाजून जखमी झाली आहे. इतर जनावरे व ट्रॅक्टर बाजुला केल्याने अन्य नुकसान टळले. अखेर जयसिंगपूर पालिका व शिरोळ दत्त कारखान्याच्या अग्निशमन … The post कोल्हापूर : उदगाव येथे ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना भीषण आग appeared first on पुढारी.

कोल्हापूर : उदगाव येथे ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना भीषण आग

जयसिंगपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : उदगांव (ता.शिरोळ) येथील बिरोबा मंदिरासमोर असलेल्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना मंगळवारी (दि.२६) रात्री साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. यात सुमारे पाच झोपड्यांसह प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. यात एक शेळी गंभीर भाजून जखमी झाली आहे. इतर जनावरे व ट्रॅक्टर बाजुला केल्याने अन्य नुकसान टळले. अखेर जयसिंगपूर पालिका व शिरोळ दत्त कारखान्याच्या अग्निशमन दलाने पाचारण केल्यानंतर आग अटोक्यात आली.
शिरोळ तालुक्यातील ऊसाचा हंगाम अजून दोन दिवस आहे. त्यामुळे ऊसतोड मजूर आपल्या गावाला जाण्याच्या तयारीत आहेत. मंगळवारी सायंकाळी महिला जेवण करीत असताना एका झोपडीला आग लागली. वारा सुटल्याने आगीने रौध्ररुप धारण करीत अन्य तीन झोपड्यांनाही कवेत घेतले. आग लागल्यानंतर ऊसतोड मजूरांनी जनावरे व लगत असलेले टॅ्रक्टर व अन्य वाहने बाजूला केली. यावेळी झोपड्यांमध्ये असलेल्या गॅस टाकीला मोठी आग लागल्याने मोठया उंचावर गॅसच्या टाकीतून आगीचे लोट जात होते. त्यानंतर जयसिंगपूर पालिका व शिरोळ दत्त कारखान्याच्या अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आल्या. त्यानंतर अग्निशमक दलाने आग आटोक्यात आणली. मात्र यात पाच झोपड्यामधील अन्न, धान्य, कपडे असे प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. शिवाय एक शेळी या आगीत जखमी झाली आहे. सर्व साहित्य एका क्षणात जळून खाक झाल्याने ऊसतोड महिलांना अश्रू अनांवर झाले होते. त्यामुळे पाच कुटुंबातील ऊसतोड मजूराचे संसार उघड्यावर पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यत जयसिंगपूर पोलिसांत झाली नव्हती.
हेही वाचा :

Nandurbar News | नंदुरबारच्या जड वाहतुकीने घेतला आणखी एक बळी, भरधाव वाहनाखाली चिरडून तरुणाचा अंत
Jalgaon News : रंग खेळल्यानंतर आंघोळीसाठी धरणात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
नगरसूलला रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू

Latest Marathi News कोल्हापूर : उदगाव येथे ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांना भीषण आग Brought to You By : Bharat Live News Media.