Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : उत्तर भारतात सोमवारी मोठ्या उत्साहात होळी साजरी झाली. मात्र काही ठिकाणी रंग उधळणीच्या नावाखाील बिभस्त आणि अश्लील चाळ्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच दोन तरुणींचा दुचाकीवरील अश्लील आणि बिभस्त चाळ्यांचा व्हिडिओ चाळ्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. या प्रकरणी संबंधित तरुणींना ३३ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
होळी हा रंगांचा सण आहे. देशभरात होळीचा सण उत्साहात सुरू आहे. यादरम्यान दिल्ली मेट्रोमध्ये होळी साजरी करताना असभ्य वर्तन करणाऱ्या दोन मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर आता नोएडामधून असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. होळीच्या दिवशी स्कूटरवरून जाणाऱ्या दोन मुली अश्लील हावभाव करत एकमेकींना रंग लावताना दिसत आहेत. पोलिसांनीही याची दखल घेत दंड केला आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या नोएडातील आहे. व्हिडिओमध्ये एका दुचाकीवरून दोन तरूणी आणि एक तरूण जात असल्याचे दिसत आहे. स्कूटीवरून जाताना या दोन तरूणी एकमेकींना रंग लावत आहेत. दोघीही रंग लावताना अश्लील हावभाग करत असल्याचे दिसत आहे. अभिषेक तिवारी यांनी हा व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर केला आहे.
पोलिसांकडून ३३ हजार रुपयांचा दंड
‘रंग’ उधळणीच्या नावाखाली तरुणींच्या अश्लील आणि बिभस्त चाळ्याच्या वर्तनांची पाेलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. तरुणींना ३३ हजार रुपयांचा दंड ठाेठावला आहे. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे आणि मुख्य रस्त्यांवर स्टंट करणाऱ्या तरूणांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये पाेलिसांनी कठाेर कारवाई केली आहे.
नोएडा में स्कूटी सवार दो लड़कियों की स्टंटबाजी
अश्लीलता की हदें पार कर एक-दूसरे को लगाया गुलाल
कटा 33 हजार का चालान pic.twitter.com/aTv0LaeZnG
— Abhishek Tiwari (@abhishe_tiwary) March 26, 2024
Latest Marathi News ‘रंग’ उधळण्याच्या नावाखाली अश्लील आणि बिभस्त चाळे, तरुणींना ३३ हजारांचा दंड Brought to You By : Bharat Live News Media.