कागल : Bharat Live News Media वृत्तसेवा : गेल्या चार-पाच महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या आशुतोष संजय लोंढे (वय २०, रा. व्हन्नूर) याने लिव्ह इन पार्टनर आणि तिच्या आईच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले.
संबंधित बातम्या :
लिव्ह इन रिलेशनशिप स्थैर्य नसलेले, टाइमपास नाते – उच्च न्यायालय | Live-in relationships are time pass
लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणार्या प्रेयसीचा चाकूने भोसकून निर्घृण खून
रक्तरंजित मार्गावर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’
याप्रकरणी प्राजक्ता तानाजी खाडे (वय ४३) व तन्वी तानाजी खाडे (वय १८, रा. व्हन्नूर) यांच्याविरोधात जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याबद्दल कागल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघींना कागल पोलिसांनी अटक केली आहे. तन्वी तानाजी खाडे व आशुतोष लोंढे हे गतवर्षी २७ ऑक्टोबरपासून लिव्ह इनमध्ये कागल येथे राहत होते. त्यांच्यामध्ये सतत वाद होत होता. वादाचे पर्यवसान टोकाच्या निर्णयपर्यंत पोहचले. आशुतोष याने मानसिक त्रास असह्य झाल्याने २२ मार्च रोजी मध्यरात्री विषारी औषध प्राशन केले. त्याच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
मेव्हणीच्या लिव्ह इन पार्टनरचा बहिणीच्या नवऱ्याने काढला काटा
चार वर्षे होते ‘लिव्ह इन’मध्ये; आता त्रास द्यायला लागला म्हणून प्रेयसीने काढला प्रियकराचा काटा
Latest Marathi News ‘लिव्ह इन’ मधून युवकाने जीवन संपवले; माय-लेकीवर गुन्हा Brought to You By : Bharat Live News Media.