मॉस्‍को हल्‍ल्‍यामागे कट्टरपंथी इस्लामवादीच;पण ‘आदेश’ कोणाचा हे तपासणार : पुतिन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मॉस्‍कोवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यामागे कट्टरपंथी इस्लामवादीच आहे, असे मान्‍य करत या हल्ल्याचा आदेश कोणी दिला? हे तपासावे लागेल, असे सांगत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्‍हा एकदा या प्रकरणी युक्रेनकडे बोट दाखवले. पुतिन यांनी म्‍हटलं आहे की, शनिवार, २३ मार्च रोजी मॉस्कोमधील क्रोकस सिटी हॉलमध्ये झालेल्‍या भीषण दहशतवादी हल्ला इस्लामिक अतिरेक्यांनी … The post मॉस्‍को हल्‍ल्‍यामागे कट्टरपंथी इस्लामवादीच;पण ‘आदेश’ कोणाचा हे तपासणार : पुतिन appeared first on पुढारी.
मॉस्‍को हल्‍ल्‍यामागे कट्टरपंथी इस्लामवादीच;पण ‘आदेश’ कोणाचा हे तपासणार : पुतिन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : मॉस्‍कोवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यामागे कट्टरपंथी इस्लामवादीच आहे, असे मान्‍य करत या हल्ल्याचा आदेश कोणी दिला? हे तपासावे लागेल, असे सांगत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुन्‍हा एकदा या प्रकरणी युक्रेनकडे बोट दाखवले.
पुतिन यांनी म्‍हटलं आहे की, शनिवार, २३ मार्च रोजी मॉस्कोमधील क्रोकस सिटी हॉलमध्ये झालेल्‍या भीषण दहशतवादी हल्ला इस्लामिक अतिरेक्यांनी केला. या हल्‍ल्‍यात आतापर्यंत १३९ नागरिकांचा मृत्‍यू झाला आहे. या नरसंहारात युक्रेनचाही सहभाग होता, असा दावाही त्‍यांनी केला आहे.
हल्‍ल्‍याचा आदेश कोणी दिला हे तपासावे लागेल
कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा आदेश कोणी दिला,या प्रश्‍नाचा उत्तर अद्याप मिळालले नाही. अशा प्रकारच्‍या हल्‍ल्‍याचा फायदा कोणाला मिळू शकतो, हे सर्वांनाचा माहित आहे. आपल्या देशाशी युद्ध करणाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांच्या संपूर्ण मालिकेतील एक दुवा असू शकतो, असेही पुतिन म्‍हणाले.
यापूर्वी पुतिन यांनी दावा केला होता की, “मॉस्को कॉन्सर्ट हॉलमधील हल्लेखोरांनी युक्रेनला पळून जाण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्‍यांनी मॉस्कोच्या नैऋत्येस सुमारे 340 किमी अंतरावर असलेल्या ब्रायन्स्क प्रदेशात प्रवेश केला होता. युक्रेनच्या बाजूने काही लोकांनी चार हल्लेखोरांना रशियाकडून सीमा ओलांडू देण्याची तयारी केली होती.”
अमेरिकेने फेटाळला होता रशियाचा दावा
पुतिन यांचा आरोप युक्रेनचे अध्‍यक्ष झेलेन्स्की यांनी फेटाळला होता. मॉस्‍कोवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने या दहशतवादी संघटनेने स्‍वीकारली होती. तर अमेरिकेने दावा केला होता की, एक महिन्‍यापूर्वीच रशियावर अशा प्रकारचा हल्‍ला होवू शकतो, असा इशारा देण्‍यात आला होता. युक्रेनचा या हल्ल्याशी काही संबंध असल्याचे समर्थन करणारे कोणतेही पुरावे नाहीत, असेही अमेरिकेने म्‍हटले होते.
हेही वाचा : 

रशियावर दहशतवादी हल्‍ला : राष्‍ट्राध्‍यक्ष पुतिन म्‍हणाले, “आमची वेदना…”
रशिया राष्‍ट्राध्‍यक्ष निवडणूक : मतदानाच्‍या अखेरच्‍या दिवशी युक्रेनकडून मोठा ड्रोन हल्‍ला
Moscow Concert Hall Attack : ‘IS खोरासान’ किती धोकादायक? रशियावर दहशतवादी हल्‍ला का केला?

Latest Marathi News मॉस्‍को हल्‍ल्‍यामागे कट्टरपंथी इस्लामवादीच;पण ‘आदेश’ कोणाचा हे तपासणार : पुतिन Brought to You By : Bharat Live News Media.