सेल्फीच्या छंदामुळे तरुणांमध्ये नवा रोग ‘सेल्फी एल्बो’

मोबाईल फोनच्या कॅमेर्‍यातून फोटो काढायला कुणालातरी सांगण्यापेक्षा स्वतःच फोटो काढण्याच्या छंदप्रकाराने अवघी तरुणाई अक्षरशः वेडी झाली आहे. या नव्या छंदापायी अनेक अपघातही घडलेले दिसतात. याखेरीज तरुणांमध्ये एक नवा रोग दिसून येतो, तो म्हणजे सेल्फी एल्बो. (Selfie Elbow) सेल्फी एल्बोचे प्रकार खेळताना मैदानात एकाच प्रकारे खेळल्याने कोपर्‍याला वेदना होतात. त्याला टेनिस एल्बो, गोल्फर्स एल्बो म्हटले जाते. … The post सेल्फीच्या छंदामुळे तरुणांमध्ये नवा रोग ‘सेल्फी एल्बो’ appeared first on पुढारी.

सेल्फीच्या छंदामुळे तरुणांमध्ये नवा रोग ‘सेल्फी एल्बो’

डॉ. संजय गायकवाड

मोबाईल फोनच्या कॅमेर्‍यातून फोटो काढायला कुणालातरी सांगण्यापेक्षा स्वतःच फोटो काढण्याच्या छंदप्रकाराने अवघी तरुणाई अक्षरशः वेडी झाली आहे. या नव्या छंदापायी अनेक अपघातही घडलेले दिसतात. याखेरीज तरुणांमध्ये एक नवा रोग दिसून येतो, तो म्हणजे सेल्फी एल्बो. (Selfie Elbow)
सेल्फी एल्बोचे प्रकार
खेळताना मैदानात एकाच प्रकारे खेळल्याने कोपर्‍याला वेदना होतात. त्याला टेनिस एल्बो, गोल्फर्स एल्बो म्हटले जाते. पण, कोणताही खेळ न खेळताही तरुणाईला हाताच्या कोपर्‍याच्या वेदना जाणवू लागल्या आहेत. वैद्यकीय भाषेत त्याला ‘सेल्फी एल्बो’ म्हणतात. सेल्फी एल्बोमध्ये मान, खांदे, कोपरे, मनगट आणि हातांची मूठ यांचे नुकसान होते. आपण जेव्हा सेल्फी काढतो तेव्हा मान आणि हात यांची एक विशेष स्थिती असते. त्यात मान आणि खांदे वरच्या बाजूला उचललेले असतात. कोपरे सरळ किंवा वाकवलेले तसेच मनगटही वाकवलेले असते.
Selfie Elbow : नाजूक पेशींचे नुकसान
सतत एकाच प्रकारचे काम केल्यास कोपरातील नाजूक पेशींचे नुकसान होते. त्यांच्या घर्षणामुळे वेदना आणि सूज येते. कदाचित ह्या वेदना लगेच जाणवणार नाहीत; परंतु हळूहळू ह्या वेदना सुरू होतात आणि एक वेळ अशी येते, जेव्हा रोजची कामे करणेही अवघड जाते.
Selfie Elbow : उपचार
सेल्फी एल्बो (Selfie Elbow) हा तसे पाहता फार गंभीर आजार नाही; पण त्याकडे दुर्लक्षही करू नका. यावर उपचार कऱण्यासाठी फिजिओथेरेपीचा वापर केला जातो. कोपर्‍याच्या वेदनांमध्ये आराम मिळावा यासाठी ते व्यायाम करवून घेतात. त्यामुळे कोपराच्या स्नायूंना ताकद मिळते. शिवाय शरीराचे जे नुकसान होते ते कमी करण्यासही मदत होते. वेदना आणि सूज कमी व्हावी, यासाठी मॅन्युअल म्हणजे हातांच्या वापराने उपचार केले जातात. फिजिओथेरपिस्ट रुग्णाच्या सांध्यांना स्वहस्ते उपचार करतात.
Selfie Elbow : प्राथमिक उपचार
सेल्फी एल्बोवर (Selfie Elbow) प्राथमिक उपचार करता येतात त्याला आरटीसीई असे म्हणतात. म्हणजे रेस्ट, आईस, कंप्रेशन, एलिवेशन. सोप्या भाषेत आराम करणे, बर्फाने शेकणे, हाताला पट्टी बांधणे आणि हात उंचावर ठेवणे होय.
हेही वाचा : 

स्पायनल ट्युमरपासून बचाव कसा कराल?
TB : करू क्षयरोगावर मात!
ओव्हेरियन कॅन्सर आहे सर्वात घातक, जाणून घ्या लक्षणे

Latest Marathi News सेल्फीच्या छंदामुळे तरुणांमध्ये नवा रोग ‘सेल्फी एल्बो’ Brought to You By : Bharat Live News Media.