कशाचाच काही नेम नसतो!

तिकडे कुठेतरी मकाऊ नावाचा देश आहे म्हणे. आपल्यासारख्या सामान्य लोकांना तर जगातील सगळे देशपण माहीत नसतात. आता तुम्ही म्हणाल, हा मकाऊचा काय विषय आहे? तर, एका पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षाचे जुगार खेळतानाचे फोटो विरोधी पार्टीने व्हायरल केले. शिवाय संबंधित महोदयांनी मकाऊ येथे जुगारांमध्ये साडेतीन कोटी रुपये उडवले, अशी बातमी पसरवून दिली. लगोलग अध्यक्ष महोदयांनी याचा साफ … The post कशाचाच काही नेम नसतो! appeared first on पुढारी.
#image_title

कशाचाच काही नेम नसतो!

तिकडे कुठेतरी मकाऊ नावाचा देश आहे म्हणे. आपल्यासारख्या सामान्य लोकांना तर जगातील सगळे देशपण माहीत नसतात. आता तुम्ही म्हणाल, हा मकाऊचा काय विषय आहे? तर, एका पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षाचे जुगार खेळतानाचे फोटो विरोधी पार्टीने व्हायरल केले. शिवाय संबंधित महोदयांनी मकाऊ येथे जुगारांमध्ये साडेतीन कोटी रुपये उडवले, अशी बातमी पसरवून दिली. लगोलग अध्यक्ष महोदयांनी याचा साफ शब्दात इन्कार केला आणि आपण आयुष्यात कधीच जुगार खेळलो नाही, असाही खुलासा केला. अशा प्रकारचे काहीतरी आरोप झाल्यानंतर साहजिकच ज्यांच्यावर आरोप झाले ते शांत थोडीच बसणार होते? त्यांनीही एका पक्षाच्या युवा नेत्याचा हातामध्ये रंगीत द्रव असलेला ग्लास पकडलेला फोटो व्हायरल केला.
जी परिस्थिती जुगाराची तीच परिस्थिती या रंगीत द्रवाची असते. ज्या देशांमध्ये भरपूर पर्यटन असते तिथे इतर देशातील पर्यटकांना अनुभव मिळावा म्हणून अवघ्या काही रुपयांत डमी जुगार उभा केलेला असतो. तसा तर तो भारतातील बर्‍याच हॉटेलमध्ये असतो. सदरील अध्यक्ष महोदय तिथे गेले असावेत आणि काय प्रकार सुरू आहे हे पाहत असतील, तेवढ्यात कुणीतरी फोटो काढले असावेत आणि ते फोटो व्हायरल केले असावेत. युवा नेत्याच्या ग्लासच्या फोटोबद्दल अद्याप कोणी काहीही खुलासे केलेले नाहीत. काळा चहा म्हणजे डीकॉशन चहा कोणत्याही ग्लासामध्ये घेतला तरी तो दुरून पाहणाराला मद्य भरलेला पेला वाटू शकतो. आता हा कदाचित एकच पेला होता आणि त्यात नेमके काय होते किंवा संबंधित युवा नेत्याने कधीच अशा प्रकारचे रंगीत द्रव घेतलेले नाही, असा काही खुलासा झालेला नाही.
आजच्या काळामध्ये झपाट्याने पसरणार्‍या संसर्गजन्य आजारासारखा एखादा फोटो अवघ्या काही क्षणात देशभर पसरू शकतो, त्याला अतिशय अचूक असा शब्द म्हणजे फोटो, बातमी, व्हिडीओ, व्हायरल होणे हा वापरला जातो. म्हणजे ज्या गतीने व्हायरस पसरतो आणि रोगाचा प्रसार करतो, त्याच गतीने अशा बातम्या पसरवल्या जातात. व्हायरस म्हणजे विषाणू. त्याच्यापेक्षाही झपाट्याने पसरणारी बातमी म्हणजे व्हायरल होण्याचा प्रकार. एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी मिळाली तर राजकीय पक्ष कोणत्या टोकाला जातील, हे काही सांगता येत नाही.
या लोकांपेक्षा तुमचे-आमचे बरे असते. तुमचे- आमचे म्हणजे आपल्यासारख्या सामान्य लोकांचे. आपण जत्रेमध्ये जातो, तिथे काही खेळ खेळतो. उदाहरणार्थ समजा, छर्र्‍याच्या बंदुकीने फुगे फोडण्याचा स्टॉल असतो. आता समजा, तुम्ही- आम्ही पाच-दहा रुपये भरून ती बंदूक हातात घेतली आणि नेम धरून फुगे फोडले तर गंमत येते. पण समजा, तुम्ही बंदूक हातात घेतली एवढाच वेगळा फोटो काढून तो व्हायरल केला जाऊ शकतो. त्या फोटोमध्ये असतील समजा संदीपराव किंवा सचिनराव. त्यांनी घेतली अमुक तमुकची सुपारी. बंदुकीने गोळी मारताना फोटो झाला व्हायरल. पण असे काही होणार नाही कारण आपण सामान्य माणसं असतो. उच्च पदावर किंवा राजकारणामध्ये असलेल्या लोकांना मात्र अशा बंदुका हातात घेऊन जत्रेमधले फुगे फोडण्याची अजिबात परवानगी नसते. जे यामध्ये गाफील राहतात, त्यांचे फोटो व्हायरल करून प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न होतो. कधी काय व्हायरल होईल कुणीही सांगू शकत नाही. आपले आपण संभाळून असलेले बरे. अन्यथा कधी काय घडेल याचा काही नेम नाही.

The post कशाचाच काही नेम नसतो! appeared first on पुढारी.

तिकडे कुठेतरी मकाऊ नावाचा देश आहे म्हणे. आपल्यासारख्या सामान्य लोकांना तर जगातील सगळे देशपण माहीत नसतात. आता तुम्ही म्हणाल, हा मकाऊचा काय विषय आहे? तर, एका पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षाचे जुगार खेळतानाचे फोटो विरोधी पार्टीने व्हायरल केले. शिवाय संबंधित महोदयांनी मकाऊ येथे जुगारांमध्ये साडेतीन कोटी रुपये उडवले, अशी बातमी पसरवून दिली. लगोलग अध्यक्ष महोदयांनी याचा साफ …

The post कशाचाच काही नेम नसतो! appeared first on पुढारी.

Go to Source