कोल्हापूर शहरात चार गर्भवतींना झिकाची बाधा
एकनाथ नाईक
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात चार गर्भवती महिलांना झिका व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने तत्काळ या चार महिलांची सोनोग्राफी करून गर्भास धोका नसल्याची खात्री केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सप्टेंबर महिन्यात इचलकरंजी शहरात झिका व्हायरसचे तीन रुग्ण आढळले होते. आता कोल्हापूर शहरात या व्हायरसने शिरकाव केल्याने आरोेग्य विभागाची झोप उडाली आहे. नागाळा पार्क येथे 3 नोव्हेंबर रोजी 66 वर्षांच्या महिलेला झिकाची लागण झाल्याचे आढळले होते. यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ 457 गर्भवती महिलांचे झिका व्हायरस तपासणीसाठी नमुने घेतले. यातील चार महिलांचे झिका व्हायरसचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ताप, पुरळ, सांधेदुखी, स्नायू दुखणे, डोके दुखी, डोळे लाल होणे ही झिका व्हायरसची लक्षणे आहेत. मात्र, यापैकी एकही लक्षण या गर्भवती महिलांमध्ये नाही. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाच्या पथकाने संबंधितांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांची वारंवार आरोग्य तपासणी केली जात आहे.
झिका व्हायरस आढळलेल्यांमध्ये विचारेमाळ, कदमवाडी, टेंबलाईवाडी, शाहू मिल कॉलनी राजारामपुरी येथील प्रत्येकी 1 गर्भवती महिलेला समावेश आहे. 20 ते 35 वयोगटातील या महिला आहेत. महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा, कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. योगेश साळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका साथ रोग अधिकारी डॉ. निखिल पाटील यांच्यासह वैद्यकीय पथक नागरिकांमध्ये जनजागृतीसह झिका व्हायरस सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आढळले 8 रुग्ण
जिल्ह्यात इचलकरंजी येथे सप्टेंबर 2023 मध्ये झिका व्हायरसचे तीन रुग्ण सापडले होते. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर शहरातील नागाळा पार्क येथे 66 वर्षीय वृद्ध महिला झिका व्हायरसची आढळून आली. महापालिका आरोग्य विभागाने गर्भवती महिलांचे सर्वेक्षण राबविले. यात 457 गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी घेतले. यात चार गर्भवतींना या व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत जिल्ह्यात आठ झिका व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत.
The post कोल्हापूर शहरात चार गर्भवतींना झिकाची बाधा appeared first on पुढारी.
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात चार गर्भवती महिलांना झिका व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने तत्काळ या चार महिलांची सोनोग्राफी करून गर्भास धोका नसल्याची खात्री केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सप्टेंबर महिन्यात इचलकरंजी शहरात झिका व्हायरसचे तीन रुग्ण आढळले होते. आता कोल्हापूर शहरात या …
The post कोल्हापूर शहरात चार गर्भवतींना झिकाची बाधा appeared first on पुढारी.