नवरदेवाने घातला चक्क २० लाखांच्या नोटांचा हार
चंदीगड : सोशल मीडियावर नेहमीच मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात लग्नाच्याही व्हिडीओंचा समावेश होतो. हे व्हिडीओ कधी पोट धरून हसायला लावतात, तर कधी भावनिक करतात. आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये एका नवरदेवाने लग्नात चक्क २० लाख रुपयांच्या नोटांचा हार गळ्यात घातला होता. हा हार पाचशे रुपयांच्या नोटांचा होता आणि तो पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती.
व्हिडीओत नवरदेव एका छतावर उभारलेला दिसत असून, त्याच्या गळ्यात ५०० रुपयांच्या नोटांचा हार दिसत आहे. हा व्हिडीओ हरियाणातील कुरेशीपूर गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १५ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला. ‘या पैशात घर बांधले असतेस बरे झाले असते’, अशी एकाने तर ‘हा व्हिडीओ आयकर विभागाचे अधिकारी घरी पोहोचतील’, अशी दुसर्या एकाने कमेंट केली आहे.
The post नवरदेवाने घातला चक्क २० लाखांच्या नोटांचा हार appeared first on पुढारी.
चंदीगड : सोशल मीडियावर नेहमीच मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात लग्नाच्याही व्हिडीओंचा समावेश होतो. हे व्हिडीओ कधी पोट धरून हसायला लावतात, तर कधी भावनिक करतात. आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये एका नवरदेवाने लग्नात चक्क २० लाख रुपयांच्या नोटांचा हार गळ्यात घातला होता. हा हार पाचशे रुपयांच्या नोटांचा होता आणि …
The post नवरदेवाने घातला चक्क २० लाखांच्या नोटांचा हार appeared first on पुढारी.