६५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या अखेर रद्द; पोलीस महासंचालकांचा निर्णय

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका जिल्ह्यात तीन वर्षे झालेल्या पोलिस अधिका-यांची अन्य जिल्ह्यात बदली करण्याचे आदेश लागू न होणा-या ६५ पोलिस निरीक्षकांची बदली अखेर रद्द करण्यात आली आहे. या आदेशामुळे या पोलिस अधिका-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे ६५ अधिकारी पोलिस स्टेशनमध्ये (फंक्शनल पदांवर) कार्यरत नव्हते हे या आदेशाचा आढावा घेतल्यानंतर सिध्द झाल्याने या अधिका-यांची बदली रद्द करण्यात आली … The post ६५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या अखेर रद्द; पोलीस महासंचालकांचा निर्णय appeared first on पुढारी.

६५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या अखेर रद्द; पोलीस महासंचालकांचा निर्णय

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबई- केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका जिल्ह्यात तीन वर्षे झालेल्या पोलिस अधिका-यांची अन्य जिल्ह्यात बदली करण्याचे आदेश लागू न होणा-या ६५ पोलिस निरीक्षकांची बदली अखेर रद्द करण्यात आली आहे. या आदेशामुळे या पोलिस अधिका-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे ६५ अधिकारी पोलिस स्टेशनमध्ये (फंक्शनल पदांवर) कार्यरत नव्हते हे या आदेशाचा आढावा घेतल्यानंतर सिध्द झाल्याने या अधिका-यांची बदली रद्द करण्यात आली आहे. राज्याच्या प्रशासकीय लवाद(मॅट)चा आदेश आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बदल्या झाल्या आहेत की नाही याची पडताळणी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केल्यानंतर राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने या बदली रद्द करण्यात येत असल्याचे आदेश काढले आहेत.
त्यामुळे या ६५ अधिका-यांना ते बदलीपूर्वी ज्या जिल्ह्यात कार्यरत होते त्या जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. तीन वर्षे एका जिल्ह्यात पूर्ण झालेल्या पोलिस अधिका-यांची अन्य जिल्ह्यात बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयाने ३० जानेवारीला एक आदेश जारी करून राज्यातील १३० पोलिस निरीक्षकांची बदली केली होती. या आदेशाविरूद्ध काही अधिका-यांनी प्रशासकीय लवाद (मॅट)कडे आव्हान दिले होते. हे बदली आदेश निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार आहेत की नाहीत, हे पडताळण्याचे आदेश मॅटने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना दिले होते. त्यानुसार मुख्य निवडणूक अधिका-यांनी पोलिसांच्या प्रमुख अधिका-यांच्या बैठका घेतल्या. यानंतर २२ फेब्रुवारीला मुख्य निवडणूक अधिका-यांनी पोलिस विभागाला सूचना दिल्या. निवडणूक अधिका-यांच्या पडताळणीत पुणे, पिंपरी चिचवड पोलिस आयुक्तालय, ठाणे शहर व विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय यांच्या अंतर्गत कार्यरत अधिका-यांच्या झालेल्या बदल्यांपैकी २३ पोलिस निरीक्षक हे कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये तैनात(कार्यरत)नव्हते याचा अर्थ ते फंक्शनल पदावर कार्यरत होते व त्यामुळे त्यांना निवडणूक आयोगाचे निर्देश लागू करण्यापासून सवलत आहे, असे मत मुख्य निवडणूक अधिका-यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना कळविले. यानंतर पोलिस महासंचालक कार्यालयाने स्वतः ३० जानेवारी २४ च्या आदेशाची पडताळणी केली असता त्यांनाही नागपूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय आणि पोलिस उप महानिरीक्षक, गडचिरोली यांच्या अंतर्गत बदली झालेल्या अधिका-यांपैकी ४२ अधिकारीही फंक्शनल पदावर कार्यरत असल्याचे आढळले. त्यामुळे या ६५ अधिका-यांची बदली रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाने मुख्य निवडणूक अधिका-यांना पाठविला. त्यांनी या प्रस्तावास २७ फेब्रुवारीस संमती दिल्यानंतर ४ मार्च सोमवारी हे बदली रद्द करण्याचे आदेश जारी करण्यात आले.
Latest Marathi News ६५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या अखेर रद्द; पोलीस महासंचालकांचा निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.