बीड : लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार; गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल

गेवराई (बीड), पुढारी वृत्तसेवा : शहरातील आहिल्यानगर भागात राहणाऱ्या एका (२९) वर्षीय  विवाहतेवर लग्नाचे आमिष दाखवून एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांत आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर दिलीप मोरे (वय ३२) राहणार राजपिंप्री (गेवराई) असे सदर गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीचे राजपिंप्री (गेवराई) येथील भागात … The post बीड : लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार; गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

बीड : लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार; गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल

गेवराई (बीड), पुढारी वृत्तसेवा : शहरातील आहिल्यानगर भागात राहणाऱ्या एका (२९) वर्षीय  विवाहतेवर लग्नाचे आमिष दाखवून एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांत आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर दिलीप मोरे (वय ३२) राहणार राजपिंप्री (गेवराई) असे सदर गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपीचे राजपिंप्री (गेवराई) येथील भागात कापड दुकान आहे. पीडित महिला दुकानात कपडे खरेदीसाठी गेली असता, तिला कपडे दाखवण्याच्या बहाण्याने अश्लील भावनेतून स्पर्श केला. तसेच तुम्ही माझ्या दुकानात पहिल्यांदाच आला आहात, चहा घेऊया असे म्हणून बराच वेळ थांबवून घेतले. तसेच कपड्याचे बील तयार करून सदर महिलेकडे मोबाईल नंबर मागितला. मला फोनवर तुमच्याशी महत्वाचे बोलायचे आहे, भेटायचे असे अश्लील बोलणे केले.

योगी आदित्यनाथांनी घेतली ‘यूपी’च्या मुख्यमंत्रिपदाची शपथ, पंतप्रधान मोदी उपस्थित

त्यानंतर सदर आरोपीने पीडितेला शासकीय आयटीआय परिसरात बोलावले. त्याठिकाणी गेल्यानंतर तुम्ही माझ्या दुकानात आल्यापासुन माझ्या स्वप्नात येता असे सांगून पीडितेच्या अंगाला स्पर्श केला. तसेच त्या पीडितेवर इच्छा नसतानाही अतिप्रसंग केला. या घटनेनंतर ती पीडिता त्या ठिकाणाहून निघून गेली. पुन्हा सदर आरोपीने पीडित महिलेला त्रास द्यायला सुरूवात केली. आरोपी पीडितेला फोन करून बोलू लागला की, “तू जर नाही आली तर, मी तुझ्या घरी येईन. नवीन बसस्थानकावर गेले असता बळजबरीने रिक्षात बसवून लॉजवर घेऊन जाऊन माझ्या इच्छेविरूद्ध माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले. पीडितीने त्याला लग्नाबाबत विचारणा केली असता, जर ही गोष्ट तू कोणाला सांगितलीस तर, तुला जिवे मारून टाकीन अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली.

पॉप गायक दलेर मेहंदीनं Metaverse वर खरेदी केली प्रॉपर्टी, नाव ठेवलं ‘बल्ले बल्ले’!

सदर पीडित विवाहितेला आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच, तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या मोठ्या बहिणीला व भावाला सांगितला. त्यांनी गेवराई पोलिसांत धाव घेतल पीडितेच्या तक्रारीवरून सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनुसुचित जाती जमाती अत्याच्यार प्रतिबंधक कायदा व लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली वरिल आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, यातील आरोपी फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड करत आहेत.
हेही वाचलत का ?

महाड : किरीट सोमय्यांना स्थानिक पत्रकारांचे वावडे : पदाधिकाऱ्यांनाही झापले
भंडारा येथील कोका अभयारण्यात वाघिणीचे दर्शन, कॅमेरात टिपले छायाचित्र
निलेश राणे यांचा संजय कदमांना सवाल, सोमय्यांचा दौरा यशस्वी करणारचं

The post बीड : लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार; गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

गेवराई (बीड), पुढारी वृत्तसेवा : शहरातील आहिल्यानगर भागात राहणाऱ्या एका (२९) वर्षीय  विवाहतेवर लग्नाचे आमिष दाखवून एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांत आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर दिलीप मोरे (वय ३२) राहणार राजपिंप्री (गेवराई) असे सदर गुन्ह्यातील आरोपीचे नाव आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीचे राजपिंप्री (गेवराई) येथील भागात …

The post बीड : लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार; गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Go to Source