सर्वात खोल जलतरण तलाव!

सर्वात खोल जलतरण तलाव!

मॉन्टेग्रेटो : जलतरण तलावात पोहणे अनेकांना पसंत असते. ज्यांना पोहण्यावर पूर्ण हुकूमत नाही, अशा नवशिक्यांसाठी अशा तलावांमध्ये कमी उंचीची रचना असते आणि ज्यांना उत्तम पोहता येते, अशा जाणकारांसाठी खोलवर पाण्याचीही सोय असते. आता, जगातील सर्वात खोल जलतरण तलाव किती खोल असू शकतो, असा प्रश्न उपस्थित होईल. याचे उत्तर म्हणजे वाय-40 डीप जॉय हा जगातील सर्वात खोल तलाव म्हणून ओळखला जातो.
अम्युझिंग प्लॅनेट न्यूज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, वाय-40 डीप जॉय हा जगातील सर्वात खोल जलतरण तलाव असून त्याची खोली एखादी 14 मजली इमारतीइतकी 42 मीटर इतकी आहे. तलावाचा पृष्ठभाग 21 मीटर बाय 18 मीटर परिसर व्यापणारा आहे. जसजसे खाली जाईल, तसतसे ते भोवर्‍यासारखे होत जाते. या जलतरण तलावात 4300 क्यूबिक मीटर पाणी असते आणि त्यातील तापमान 32 ते 34 डिग्री सेल्सियस यादरम्यान ठेवले जाते.
हा जलतरण तलाव इटलीतील मिलेपिनी टर्म हॉटेलमध्ये स्थित आहे. हा जलतरण तलाव सर्वसामान्यांसाठी 2014 मध्ये खुला करण्यात आला. त्यापूर्वी बेल्जियममधील नीमो 33 हा जलतरण तलाव सर्वात खोल मानला जायचा. त्याची खोली 34.5 मीटर्स इतकी होती. फक्त पाहणार्‍यांसाठी या तलावात ग्लास पॅनेल लावले गेले असून यामुळे तलावात आरपार पाहता येऊ शकते, हे देखील याचे वैशिष्ट्य आहे.
The post सर्वात खोल जलतरण तलाव! appeared first on पुढारी.

मॉन्टेग्रेटो : जलतरण तलावात पोहणे अनेकांना पसंत असते. ज्यांना पोहण्यावर पूर्ण हुकूमत नाही, अशा नवशिक्यांसाठी अशा तलावांमध्ये कमी उंचीची रचना असते आणि ज्यांना उत्तम पोहता येते, अशा जाणकारांसाठी खोलवर पाण्याचीही सोय असते. आता, जगातील सर्वात खोल जलतरण तलाव किती खोल असू शकतो, असा प्रश्न उपस्थित होईल. याचे उत्तर म्हणजे वाय-40 डीप जॉय हा जगातील सर्वात …

The post सर्वात खोल जलतरण तलाव! appeared first on पुढारी.

Go to Source