‘काहे दिया परदेस’ची जोडी पुन्हा परत

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेली मराठी अभिनेत्री सायली संजीव, अभिनेता ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकदा एकत्रित आली आहे. आगामी ‘समसारा’ (द वॉम्ब) या चित्रपटातून दोघांची जोडी एकत्र आली असून, नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. संबंधित बातम्या  HBD Neha Sharma : वडील आमदार; पण बोल्ड नेहाचा बॉलिवूडमध्ये … The post ‘काहे दिया परदेस’ची जोडी पुन्हा परत appeared first on पुढारी.
‘काहे दिया परदेस’ची जोडी पुन्हा परत


पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेली मराठी अभिनेत्री सायली संजीव, अभिनेता ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकदा एकत्रित आली आहे. आगामी ‘समसारा’ (द वॉम्ब) या चित्रपटातून दोघांची जोडी एकत्र आली असून, नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला.
संबंधित बातम्या 

HBD Neha Sharma : वडील आमदार; पण बोल्ड नेहाचा बॉलिवूडमध्ये तडका
Sukhee Movie : शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ ओटीटीवर टॉपला
Sanjay Gadhvi : धूम चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे हार्ट अॅटॅकने निधन

संचय प्रॉडक्शन्सच्या पुष्कर योगेश गुप्ता यांची निर्मिती असलेल्या ‘समसारा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सागर लढे केलं आहे. सागर लढे, विश्वेश वैद्य, समीर मानेकर यांच्या कथेवर समीर मानेकर, सागर लढे यांनी पटकथा लिहिली आहे. तर समीर मानेकर, निहार भावे यांनी संवाद लेखन केलं आहे. विश्वेश वैद्य यांनी संगीत, अक्षय राणे छायांकनाची जबाबदारी निभावत आहेत.

सायली संजीव, ऋषी सक्सेना, पुष्कर श्रोत्री, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. कार्यकारी निर्माता म्हणून महेश भारंबे व अन्वय नायकोडी काम पाहणार आहेत.

‘समसारा’ या चित्रपटाची कथा अतिशय अनोखी आहे. गर्भवती भानवीच्या दैवी जुळ्या मुलांना नष्ट करण्याची इच्छा असलेला एक असुर तिच्यासमोर येतो आणि देव, असूर यांच्यात युद्ध सुरू होते. त्यामुळे मृत्यूचा देव यम आणि जीवनाची देवी यमी यांची गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अत्यंत वेगळी गोष्ट आणि उत्तम स्टारकास्ट यांचा मिलाफ ‘समसारा’ या चित्रपटात झाला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांची आवडती सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकत्र पाहायला मिळणार यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
The post ‘काहे दिया परदेस’ची जोडी पुन्हा परत appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेली मराठी अभिनेत्री सायली संजीव, अभिनेता ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकदा एकत्रित आली आहे. आगामी ‘समसारा’ (द वॉम्ब) या चित्रपटातून दोघांची जोडी एकत्र आली असून, नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. संबंधित बातम्या  HBD Neha Sharma : वडील आमदार; पण बोल्ड नेहाचा बॉलिवूडमध्ये …

The post ‘काहे दिया परदेस’ची जोडी पुन्हा परत appeared first on पुढारी.

Go to Source