लाल समुद्रात जहाज अपहरणाचा थरार! हुथी बंडखोरांचा व्हिडिओ
पुढारी ऑनलाईन : येमेनच्या हुथी बंडखोरांनी अपहरण केलेल्या “गॅलेक्सी लीडर” या मालवाहू जहाजाचा कथित व्हिडिओ जारी केला आहे. हे जहाज इस्रायली असल्याचा बंडखोरांचा दावा आहे. मात्र, इस्रायलने हा दावा फेटाळला असून जहाजावर एकही इस्रायली नागरिक नसल्याचे म्हटले आहे. हे जहाज तुर्कीहून भारताकडे येत असताना काल सोमवारी त्याचे अपहरण करण्यात आले होते. हुथी बंडखोरांनी जहाजाचे अपहरण कसे केले? याचा दोन मिनिटांचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. (Yemen’s Houthi rebels hijack cargo ship)
बंडखोरांचा जहाजावर गोळीबार
बंडखोर हेलिकॉप्टरमधून जहाजाच्या डेकवर उतरतात, जिथे कोणीही दिसत नाही. त्यानंतर हातात बंदुका घेऊन गोळीबार करत ते डेकच्या पलीकडे धावतात आणि ते व्हीलहाऊस आणि नियंत्रण केंद्रावर ताबा मिळवतात. या व्हिडिओमध्ये बंडखोरांच्या बंदुकीच्या धाकामुळे जहाजावरील काही क्रू सदस्य हात वर करताना दिसत आहेत. इतर बंडखोर जहाजावर गोळीबार करून धावताना दिसत आहेत.
एएफपी वृत्तसंस्थेने सागरी सुरक्षा कंपनी अंब्रे आणि येमेनी सागरी स्रोताचा हवाला देत म्हटले आहे की, हे जहाज होदेदा प्रांतातील येमेनच्या सलीफ येमेनी बंदरात परत आले आहे.
हुथीचा प्रवक्ता मोहम्मद अब्दुल- सलाम यांनी रविवारी X वर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले होते की, जोपर्यंत इस्रायल गाझावरील हल्ले थांबवत नाही तोपर्यंत आणखी सागरी हल्ले केले जातील. बहामासचा ध्वज असलेल्या या जहाजावर विविध देशांतील सुमारे २५ क्रू सदस्य होते. या जहाजाची मालकी ब्रिटीश कंपनीकडे आहे. जी इस्रायलीचे सर्वांधिक श्रीमंत व्यक्ती अब्राहम “रामी” उंगर यांच्याशी संबंधित आहे. इराण समर्थित हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात इस्रायलशी संबंधित जहाजांना लक्ष्य करण्याचे ठरवले आहे. “इस्रायली जहाजे आमची कायदेशीर लक्ष्य आहेत आणि आम्ही कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही,” असे हुथी लष्करी अधिकारी मेजर जनरल अली अल-मोश्की यांनी म्हटले आहे. (Yemen’s Houthi rebels hijack cargo ship)
इस्रायलकडून निषेध
इस्रायलने जहाज अपहरणाच्या घटनेचा निषेध केला असून इराणवर जोरदार टीका केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आंतरराष्ट्रीय जहाजावर इराणने केलेल्या हल्ल्याचा इस्त्रायल तीव्र निषेध करतो.” त्यांनी आणखी एका पोस्टमध्ये असे नमूद केले आहे की, “हे इराणी दहशतवादाचे आणखी एक कृत्य आहे आणि जागतिक शिपिंग मार्गांच्या सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय परिणामांसह स्वतंत्र जगाच्या नागरिकांविरुद्ध इराणच्या आक्रमकतेचे एक मोठे पाऊल आहे.” दरम्यान, इराणने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
Yemen -footage of operation capturing an israeli shio in the Red Sea
This is insane. Remember this is a besieged, blockaded country still under an 8 war US-Saudi aggression pic.twitter.com/wr5ahn5bBD
— Hussein (@EyesOnSouth1) November 20, 2023
हे ही वाचा :
भारताच्या मालवाहू जहाजाचे हुती दहशतवाद्यांकडून अपहरण : अमेरिकेचा दावा
एअर इंडियाच्या विमानांवर खलिस्तानवाद्यांचा बहिष्कार
The post लाल समुद्रात जहाज अपहरणाचा थरार! हुथी बंडखोरांचा व्हिडिओ appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन : येमेनच्या हुथी बंडखोरांनी अपहरण केलेल्या “गॅलेक्सी लीडर” या मालवाहू जहाजाचा कथित व्हिडिओ जारी केला आहे. हे जहाज इस्रायली असल्याचा बंडखोरांचा दावा आहे. मात्र, इस्रायलने हा दावा फेटाळला असून जहाजावर एकही इस्रायली नागरिक नसल्याचे म्हटले आहे. हे जहाज तुर्कीहून भारताकडे येत असताना काल सोमवारी त्याचे अपहरण करण्यात आले होते. हुथी बंडखोरांनी जहाजाचे अपहरण …
The post लाल समुद्रात जहाज अपहरणाचा थरार! हुथी बंडखोरांचा व्हिडिओ appeared first on पुढारी.