भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी मागविले अर्ज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीसीसीआयने भारतीय पुऊष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी साडेतीन वर्षांच्या कालावधीसाठी अर्ज मागवले आहेत. कारण विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ पुढील महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकाने संपणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 27 मे अशी आहे, असे बोर्डाने म्हटले आहे.
निवड प्रक्रियेत अर्जांचे सखोल पुनरावलोकन, त्यानंतर वैयक्तिक मुलाखती आणि निवडलेल्या उमेदवारांच्या मूल्यांकनाचा समावेश असेल, असे मंडळाने पुढे म्हटले आहे. निवडलेले नवे प्रशिक्षक 1 जुलैपासून म्हणजे अमेरिकेतील टी-20 विश्वचषकानंतर लगेचच संघाची जबाबदारी स्वीकारतील आणि त्यांची मुदत 31 डिसेंबर, 2027 रोजी संपेल.
बीसीसीआयने अट घातली आहे की, उमेदवार 60 वर्षांपेक्षा कमी वयाचा, किमान 30 कसोटी किंवा 50 एकदिवसीय सामने खेळलेला असावा आणि अर्जदाराने किमान दोन वर्षांसाठी पूर्ण सदस्य कसोटी राष्ट्रासाठी अशी भूमिका बजावली असावी. अलीकडेच बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले होते की, जर द्रविडला टी-20 विश्वचषकानंतर प्रशिक्षकपदी राहायचे असेल, तर त्याला पुन्हा अर्ज करावा लागेल.
राहुल द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्याला प्रशिक्षकपदी राहणे चालू ठेवायचे असल्यास पुन्हा अर्ज करावा लागेल. आम्ही दीर्घकालीन म्हणजे तीन वर्षांसाठी सेवा देऊ शकणारा प्रशिक्षक शोधत आहोत, असे शाह यांनी अलीकडेच काही निवडक माध्यमांना सांगितले होते. परंतु प्रस्तावित दीर्घ कार्यकाळ 3.5 वर्षे इतका असल्याने द्रविडला पुन्हा अर्ज करणे कठीण होईल. कारण त्याने नोव्हेंबर, 2021 पासून ही जबाबदारी पेललेली आहे. मूलत: द्रविडचा दोन वर्षांचा करार गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या 50 षटकांच्या विश्वचषकासह संपुष्टात आला होता. परंतु भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा आणि अमेरिकेतील टी-20 विश्वचषकापूर्वी नवीन प्रशिक्षक नियुक्त करण्याच्या बाबतीत पुरेसा वेळ नसल्याने तो वाढवण्यात आला होता.
तथापि, नवीन प्रशिक्षकाला त्याच्या कार्यकाळात काही महत्त्वाच्या मालिकांना व स्पर्धांना सामोरे जावे लागेल. त्याची सुरुवात जुलैमध्ये श्रीलंकेतील मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेपासून होणार आहे. पुढे बांगलादेश आणि न्यूझीलंडविऊद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळल्या जातील. त्याआधी ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी प्रवास करावा लागेल. त्यानंतर 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे.
Home महत्वाची बातमी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी मागविले अर्ज
भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी मागविले अर्ज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बीसीसीआयने भारतीय पुऊष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी साडेतीन वर्षांच्या कालावधीसाठी अर्ज मागवले आहेत. कारण विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ पुढील महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषकाने संपणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 27 मे अशी आहे, असे बोर्डाने म्हटले आहे. निवड प्रक्रियेत अर्जांचे सखोल पुनरावलोकन, त्यानंतर वैयक्तिक मुलाखती आणि निवडलेल्या उमेदवारांच्या मूल्यांकनाचा […]