अंकुशिता बोरो, निशांत देव उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था /बँकॉक
माजी जागतिक युवा चॅम्पियन अंकुशिता बोरो (60 किलो) आणि निशांत देव (71 किलो) यांनी बुधवारी येथे जागतिक बॉक्सिंग ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहज विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याशिवाय, गत राष्ट्रीय चॅम्पियन अरुंधती चौधरीने 66 किलो वजनी गटात सहज विजय मिळवून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तर आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता नरेंद्र बेरवालला (92 किलोपेक्षा जास्त) पराभवाचा सामना करावा लागला. बुधवारी बोरोचा सामना आशियाई चॅम्पियन कझाकिस्तानच्या रिम्मा वोलोसेन्कोशी झाला. सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळणाऱ्या अंकुशिताला तुलनेने जास्त उंच असलेल्या प्रतिस्पर्धी रिम्माचा फारसा त्रास जाणवला नाही. अंकुशिताने शानदार खेळ साकारात तिला 4-1 असे नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याशिवाय, पुरुषांच्या 71 किलो गटात निशांत देवने थायलंडच्या पीरापतचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. संपूर्ण सामन्यावर निशांत देवने वर्चस्व गाजवले, हे विशेष. याशिवाय, अन्य लढतीत भारताच्या अरुंधती चौधरीने प्युर्तो रिकोच्या स्टेफनीचा 5-0 असा धुव्वा उडवत दुसरी फेरी गाठली. या लढतीत अरुंधतीने प्रतिस्पर्धी स्टेफनीला जराही वरचढ होण्याची संधी दिली नाही. तसेच पुरुषांच्या 92 किलोपेक्षा वरील गटात नरेंद्रला इक्वेडोरच्या गेरलोनकडून 3-2 असा पराभव स्वीकारावा लागला. आज सचिन सिवाच (57 किलो) तुर्कीच्या बटुहान सिफ्टीविरुद्ध खेळणार आहे तर 2022 राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता अमित पंघल (51 किलो), संजीत (92 किलो) आणि जस्मिन (महिला 57 किलो) आपल्या मोहिमेला सुरुवात करतील.
Home महत्वाची बातमी अंकुशिता बोरो, निशांत देव उपांत्यपूर्व फेरीत
अंकुशिता बोरो, निशांत देव उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था /बँकॉक माजी जागतिक युवा चॅम्पियन अंकुशिता बोरो (60 किलो) आणि निशांत देव (71 किलो) यांनी बुधवारी येथे जागतिक बॉक्सिंग ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सहज विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. याशिवाय, गत राष्ट्रीय चॅम्पियन अरुंधती चौधरीने 66 किलो वजनी गटात सहज विजय मिळवून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तर आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता नरेंद्र बेरवालला […]