अंजली निंबाळकर यांचा हल्याळ-जोयडा भागात प्रचार दौरा
खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातील हल्याळ, दांडेली जोयडा भागात रविवारी काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांचा प्रचार दौरा करण्यात आला. या भागातील मराठा समाजासह सर्वभाषिक समाजाने उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून यावेळी अंजली निंबाळकर यांना निवडून आणण्याचा एकच निर्धार केला. हल्याळ मतदारसंघाचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हल्याळ, दांडेली, जोयडा या भागात प्रचार दौरा झाला. यावेळी अंजली निंबाळकर यांचे तिन्ही ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी आर. व्ही. देशपांडे यांनी, हल्याळ मतदारसंघातून अंजली निंबाळकर यांना उच्चांकी मतदान देणार आहे. अंजली निंबाळकर या उच्चशिक्षीत असून खानापूर तालुक्याचे त्यांनी विधानसभेत नेतृत्व केले आहे. त्यावेळी त्यांनी भाजपच्या धोरणांचा कडाडून विरोध करत आपला आवाज विधानसभेत बुलंद केला होता. निंबाळकर या विकासाचा दृष्टिकोन ठेवणाऱ्या नेत्या असून त्यांच्याकडून कारवार मतदारसंघात निश्चित विकास होणार आहे. असे सांगतिले. देशपांडे पुढे म्हणाले, गेल्या 25 वर्षात भाजपने लोकसभेचे नेतृत्व केले आहे. मात्र भाजपच्या खासदारांकडून कोणताच विकास करण्यात आलेला नाही. तसेच त्यांनी सामान्य जनतेशी संपर्कही ठेवलेला नाही. याची जाणीव ठेवून मतदारांनी अंजली निंबाळकर यांना भरघोस मतानी विजयी करावे, असे आवाहन केले. यावेळी पालक मंत्री मंकाळू वैद्य, जिल्हाध्यक्ष साई गावकर, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.
Home महत्वाची बातमी अंजली निंबाळकर यांचा हल्याळ-जोयडा भागात प्रचार दौरा
अंजली निंबाळकर यांचा हल्याळ-जोयडा भागात प्रचार दौरा
खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघातील हल्याळ, दांडेली जोयडा भागात रविवारी काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांचा प्रचार दौरा करण्यात आला. या भागातील मराठा समाजासह सर्वभाषिक समाजाने उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून यावेळी अंजली निंबाळकर यांना निवडून आणण्याचा एकच निर्धार केला. हल्याळ मतदारसंघाचे आमदार आर. व्ही. देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हल्याळ, दांडेली, जोयडा या भागात प्रचार दौरा झाला. यावेळी […]