आनंद अकादमी, कर्नाटक स्टार स्पोर्ट्स विजय

केएससीए 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यप्राप्त धारवाड विभागीय संघटना आयोजित केएससीए 19 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून आनंद अकादमीने रॉजर्स क्रिकेट क्लबचा 5 गड्यानी, तर कर्नाटक स्टार स्पोर्ट्स क्लब संघाने चंम्पियन नेट संघाचा 232 धावांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळवले. ऋषी जी, व अशोक सिंग यांना समानावीर […]

आनंद अकादमी, कर्नाटक स्टार स्पोर्ट्स विजय

केएससीए 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यप्राप्त धारवाड विभागीय संघटना आयोजित केएससीए 19 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून आनंद अकादमीने रॉजर्स क्रिकेट क्लबचा 5 गड्यानी, तर कर्नाटक स्टार स्पोर्ट्स क्लब संघाने चंम्पियन नेट संघाचा 232 धावांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळवले. ऋषी जी, व अशोक सिंग यांना समानावीर पुरस्कार देण्यात आला. केएससीए बेळगाव येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात रॉजर क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी करताना 48.4 षटकात सर्वगडी बाद  247 धावा केल्या. त्यात पृथ्वीने एक षटकार 3 चौकारांसह 84, योगीराज मंगसुळकरने 12 चौकारांसह 72, सुरज पाटीलने 5 चौकारांसह 34 तर हर्ष कित्तूरने 2  चौकारांसह 26 धावा केल्या. आनंद तर्फे निनाद पावसकरने 56 धावांत 3, सुमित केलगिरी व अशोक सिंग यांनी प्रत्येकी 2 तर ऋत्विक शिरोळने एक गडी बाद केला.  प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद क्रिकेट अकादमीने 39.3 षटकात 5 गडी बाद 248 धावा करून सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात अशोक सिंग 17 चौकारांसह 127 धावा करीत शानदार शतक झळकविले.
श्रवण मेणसेने 9  चौकारांसह 64 तर पार्थ किलोस्करने 13 धावा केल्या. रॉजर्स तर्फे हर्ष कित्तूरने 61 धावा 2 तर निखिल गोकुलकर व योगीराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. हुबळी येथे खेळविण्यात आलेला सामन्यात कर्नाटक स्टार स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गडी बाद 327 धावांचा डोंगर उभा केला. त्यात ऋषी जी.ने एक षटकार 16 चौकारांसह 115 धावा करून शतक झळकविले. त्याला विराज हावेरीने षटकार 13  चौकारांसह 73, अमोल पागदने  चौकारांसह 60 तर नागराजन पाटील व सिद्धू सावजी यांनी प्रत्येकी 23 धावा केल्या.  चंम्पियन क्रिकेट अकॅडमी तर्फे प्रीतम, हित पटेल, मोहिदीन यांनी प्रत्येकी 2 तर चिराग व विश्वास यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रतिउत्तरा दाखल खेळताना नेट क्रिकेट अकॅडमीचा डाव 26.5 षटकात 96 धावा आटोपला. त्यात हीत पटेलने 10  चौकारांसह 47, प्रीतम जोशने 4  चौकारांसह 19 तर ओमकारने 11 धावा केल्या. कर्नाटक स्टार तर्फे सुहास भोईने 10 धावात 3, कान्होजी व सिद्धू सावजी यांनी प्रत्येकी 2 गडी तर रमेशने 1 गडी बाद केला.