वरळी अपघात प्रकरण अपघात नसुन हत्येचा गुन्हा नोंदवण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी

सध्या वरळी प्रकरणात आरोपी मिहीर शाह ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात शिवसेने युबीटीचे नेते आदित्य ठाकरे यांनी हे प्रकरण अपघात नसून हत्येचे प्रकरण म्हणून मानले जावे अशी मागणी केली आहे.

वरळी अपघात प्रकरण अपघात नसुन हत्येचा गुन्हा नोंदवण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी

सध्या वरळी प्रकरणात आरोपी मिहीर शाह ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

या प्रकरणात शिवसेने युबीटीचे नेते आदित्य ठाकरे यांनी हे प्रकरण अपघात नसून हत्येचे प्रकरण म्हणून मानले जावे अशी मागणी केली आहे. 

पत्रकारांशी संभाषण करताना त्यांनी सत्ताधारी शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलाला अटक करण्यात दिरंगाई का करण्यात आली असा सवाल केला. 

रविवारी पहाटे मिहीर शाहने बीएमडब्ल्यूने दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्याला मागून धडक दिली आणि उडवलं. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. या अपघाताच्या दोन दिवसानंतर मिहीरला अटक केली. 

हे प्रकरण हिट अँड रन म्हणून पहिले जाऊ नये तर हे प्रकरण गुन्ह्याचे असल्याची नोंद करावी. अशी आमची मागणी आहे. 

 

वरळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी मिहीरला अटक करण्यात पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “मिहिर शाह 60 तास कुठे लपला होता? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे.

 

Edited by – Priya Dixit   

 

 

Go to Source