द्रविडने नाकारली अतिरिक्त 2.5 कोटींची बोनस रक्कम

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने अमेरिकेत नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक विजेतेपदानंतर बीसीसीआयने देऊ केलेली अतिरिक्त अडीच कोटी रुपयांची बोनस रक्कम घेण्यास नकार दिला आहे. राष्ट्रीय संघाच्या यशानंतर द्रविडला बोनस रक्कम देऊ करण्यात आली होती. परंतु इतर कोचिंग स्टाफप्रमाणेच 2.5 कोटी ऊपये स्वीकारण्यावर त्याने समाधान मानले आहे. बीसीसीआयने द्रविडला बार्बाडोसमध्ये भारताला ट्रॉफी […]

द्रविडने नाकारली अतिरिक्त 2.5 कोटींची बोनस रक्कम

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने अमेरिकेत नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक विजेतेपदानंतर बीसीसीआयने देऊ केलेली अतिरिक्त अडीच कोटी रुपयांची बोनस रक्कम घेण्यास नकार दिला आहे. राष्ट्रीय संघाच्या यशानंतर द्रविडला बोनस रक्कम देऊ करण्यात आली होती. परंतु इतर कोचिंग स्टाफप्रमाणेच 2.5 कोटी ऊपये स्वीकारण्यावर त्याने समाधान मानले आहे.
बीसीसीआयने द्रविडला बार्बाडोसमध्ये भारताला ट्रॉफी जिंकण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल त्याची बक्षीस रक्कम 5 कोटी ऊपये करून त्याच्या प्रयत्नांची परतफेड करायची होती. पण या 51 वर्षीय खेळाडूने प्रशिक्षण विभागातील इतर कर्मचाऱ्यांइतक्याच रकमेचा धनादेश स्वीकारण्यावर समाधान मानले आहे. गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या 50 षटकांच्या सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय प्रशिक्षक म्हणून द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. तथापि, कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशासकीय मंडळ द्रविडला टी-20 विश्वचषकापर्यंत कायम राहण्याची गरज पटवून देण्यात यशस्वी ठरले होते. द्रविडने शेवटी विश्वचषक विजेत्या संघाचा भाग बनून भारताच्या प्रशिक्षकपदी कारकिर्दीचा शेवट केला.