अवैध गौण खनिजची वाहतूक करणारे २ डंपर ताब्यात

अवैध गौण खनिजची वाहतूक करणारे २ डंपर ताब्यात

तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
सावंतवाडी प्रतिनिधी
अवैधरित्या गौण खनिजची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या धर्तीवर सावंतवाडी महसूल विभागाने  मुंबई – गोवा हायवेवर बांदा भागात भरारी पथक तैनात केली आहेत. काल शुक्रवारी रात्री गौण खनिजची वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमून कारवाई करण्यात आली . ही कारवाई आता कायमस्वरूपी अशीच सुरू राहणार आहे असे श्री पाटील यांनी स्पष्ट केले.गोवा ते सावंतवाडी अशी गौण खनिजाची वाहतूक होत असताना भरारी पथकाच्या कारवाईत हे दोन डंपर जप्त करण्यात आले आहेत. सदर डंपर चालकांवर जवळपास दीड लाखाहून अधिक दंड आकारला जाणार आहे. मुंबई गोवा हायवे वरून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गौण खनिज वाहतूक होत असल्याच्या तक्रारी निदर्शनास आल्या होत्या. मात्र काही दिवसांपासून बेकायदेशीर रित्या गौण खनिजची वाहतूक सुसाट पद्धतीने होत आहे. त्यासाठी आता भरारी पथक तैनात करण्यात आली आहेत .हे भरारी पथक धडक कारवाई करत आहे अशी माहिती सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली . काही दिवसांपूर्वी एका डंपर चालकाने पलायन केले होते त्यासाठी आता ही कारवाई अधिक गतिमान करण्यात आली आहे. कुठल्याही परिस्थितीत अवैधरित्या केल्या जाणाऱ्या वाहतुकीला आळा घातला जाईल असेही ते म्हणाले .