अर्बन बँकेच्या विलीनीकरण ठरावाची सावंतवाडीत आज सभा

अर्बन बँकेच्या विलीनीकरण ठरावाची सावंतवाडीत आज सभा

सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड सावंतवाडी टी. जे. एस. बी मध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव आज वार्षिक सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार आहे सायंकाळी ४ वाजल्यापासून बँकेच्या सभागृहात सभा होत असून या अगोदर दुपारी बँकेच्या सदस्यांचे मतदान घेण्यात आले .या मतदान प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात सदस्य, सभासद , संचालकांनी सहभाग घेतला होता . बहुतांशी सभासदांचे बँकेचे विलीनीकरण व्हावे असे मत आहे. त्यासाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली . ही प्रक्रिया झाल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात होणार असून यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. ते चार वाजेपर्यंत मुंबईवरून दाखल झाले नव्हते. श्री केसरकर या विस्तारीकरणच्या संदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्या कित्येक वर्षानंतर अर्बन बँकेचे आता विस्तारीकरण होणार आहे.