वाघवेत विजेचा शॉक लागून तरुण बाधंकाम कामगाराचा मृत्यू

वाघवेत विजेचा शॉक लागून तरुण बाधंकाम कामगाराचा मृत्यू

वाघवे / वार्ताहर

वाघवे ता.पन्हाळा येथे विजेचा शॉक लागून एका परप्रांतीय बाधंकाम कामगार मृत्यू झाला. सुरेश सुखदेव हसबे (वय २१, रा. उकली ता.बागेवाडी विजापूर) असे त्याचे नाव असून तो अविवाहित आहे. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली असून याची नोंद पोलिसात झाली आहे.
उकली (ता बागेवाडी , जि. विजापूर ) सुरेश हसबे हा तरुण आपल्या काही मित्रांसोबत आठ दिवसापूर्वी वाघवे ते पिंपळे दरम्यान सुरू असणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी आला होता. तो शनिवारी सकाळी मित्रांबरोबर पुलाच्या ठिकाणी काम करून वाघवे – कुऱ्हाडवाडी येथील राहत असलेल्या बंगल्यावर खांद्यावर लोखंडी सळी घेवून येत होता. यावेळी तो बंगल्याच्या जिन्यावरून चढत असताना त्यांच्या खाद्यांवरील लोखंडी सळीचा स्पर्श नजीक असलेल्या विद्युत प्रवाहित तारेला झाला. त्यामुळे त्याला विजेचा जबर शाॅक लागल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमीस उपचारासाठी तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.