पुण्यातील मुळा मुठा नदीपात्रातून महिलेचा डोके,हात,पाय नसलेला मृतदेह आढळला

सध्या महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. पुण्यातील चंदन नगर परिसरातून खराडी येथे मुळा मुठा नदीपात्रातून सोमवारी दुपारी एका महिलेचा डोकं हात,आणि पाय नसलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस …

पुण्यातील मुळा मुठा नदीपात्रातून महिलेचा डोके,हात,पाय नसलेला मृतदेह आढळला

सध्या महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. पुण्यातील चंदन नगर परिसरातून खराडी येथे मुळा मुठा नदीपात्रातून सोमवारी दुपारी एका महिलेचा डोकं,हात आणि पाय नसलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 

सोमवारी दुपारी पोलिसांना चंदन नगर परिसरात मुळा-मुठा नदी पात्रात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना हात पाय डोके नासलेले एक धड आढळले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्धेशाने महिलेची हत्या करून मृतदेह तुकडे करून पाण्यात टाकण्याचे समोर आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला अंदाजे 18 ते 30 वयोगटातील असावी. महिला कोण आहे अद्याप माहिती कळू शकली नाही. चंदन नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास करत आहे. 

Edited by – Priya Dixit   

 

Go to Source