रत्नागिरीत नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार,आरोपीला फाशीची मागणी करत परिचारिका रस्त्यावर
रत्नागिरीत एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी रत्नागिरीतील चंपक मैदानात बेशुद्धावस्थेत आढळली. मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या अंगावर जखमा आढळल्या आहे.
या घटनेनन्तर नर्सिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. या घटनेचा निषेध करत परिचारिकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे. पोलिसांना या प्रकरणी काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून ते वापरले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तरुणीच्या जबानीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी रुग्णालयाच्या समोर निर्दशने केली. आंदोलकांनी घोषणाबाजी केली. वाहतूक रोखून ठेवली. रत्नागिरीत तणावपूर्ण वातावरण बनले आहे.
Edited by – Priya Dixit