अल्बानियात नदीत कार कोसळून 8 ठार

अल्बानियात नदीत कार कोसळून 8 ठार

तिराना
अल्बानिया येथे एक कार नदीत कोसळल्याने 7 संशयित घुसखोर आणि एका स्थानिक चालकासमवेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. अल्बानियन पोलिसांनी यासंबंधी माहिती दिली आहे. मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास चालकाने नियंत्रण गमाविल्याने राजधानी तिरानापासून सुमारे 240 किलोमीटर अंतरावर वजोसा नदीत कार कोसळली. या कारचा चालक अल्बानियन होता. तर अन्य 7 जण हे इतर देशांमधून अवैध पद्धतीने अल्बानियात दाखल झाले होते असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.