मार्ना-शिवोली येथे बंगल्यात दागिन्यांसह 15 लाखांची चोरी
म्हापसा : मार्ना शिवोली येथील कॅन्टेम्पो या आलिशान बंगल्यात बुधवारी रात्री चोरट्यांनी प्रवेश करून 11 लाख 61 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच 3 लाख 15 हजार रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी हणजूण पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सार्थक राजेशकुमार गुप्ता यांच्या आलिशान बंगल्यात बुधवारी रात्री ही चोरी झाली. मात्र ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर सव्वातीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घरमालक गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार हणजूण पोलिसांनी रितसर तक्रार नोंदवून घेतली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या सहकार्याने संशयित चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संकेत पोखरे या प्रकरण अधिक तपास करीत आहेत.
Home महत्वाची बातमी मार्ना-शिवोली येथे बंगल्यात दागिन्यांसह 15 लाखांची चोरी
मार्ना-शिवोली येथे बंगल्यात दागिन्यांसह 15 लाखांची चोरी
म्हापसा : मार्ना शिवोली येथील कॅन्टेम्पो या आलिशान बंगल्यात बुधवारी रात्री चोरट्यांनी प्रवेश करून 11 लाख 61 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच 3 लाख 15 हजार रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी हणजूण पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सार्थक राजेशकुमार गुप्ता यांच्या आलिशान बंगल्यात बुधवारी रात्री ही चोरी झाली. मात्र ही घटना […]