विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करणारे हेस्कॉमचे 13 कर्मचारी दोषी
मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : उद्या ठोठावणार शिक्षा : खोट्या आरोपात गोवणाऱ्यांना दणका
बेळगाव : विनयभंग केल्याचा खोटा आरोप करून हेस्कॉमच्या मुख्य कार्यकारी अभियंत्याला गुन्ह्यात अडकविणाऱ्या 13 हेस्कॉम कर्मचाऱ्यांना न्यायालयाने दोषी ठरवून त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे खळबळ उडाली असून अशाप्रकारे दोषी ठरविण्याचा पहिलाच निकाल असल्याने खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना चांगली चपराक बसली आहे. महिला कर्मचारी बी. व्ही. सिंधू, नाथाजी पी. पाटील, अजित एम. पुजारी, मलसर्जा एस. शहापूरकर, सुभाष एम. हुल्लोळ्ळी, इराप्पा एम. पत्तार, मल्लिकार्जुन एस. रेडीहाळ, भीमाप्पा एल. गोडलकुंदरगी, राजेंद्र बी. हळंगली, सुरेश के. कांबळे, इरय्या गुरय्या हिरेमठ, मारुती भरमा पाटील, द्राक्षायणी महादेव नेसरगी या सर्व हेस्कॉम अधिकारी व कर्मचाऱ्यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाने या सर्वांना दोषी ठरविले असून गुरुवार दि. 27 रोजी या सर्वांना शिक्षा ठोठाविण्यात येणार आहे. माळमारुती पोलीस स्थानकाच्या व्याप्तीमध्ये येणाऱ्या हेस्कॉम कार्यालयातील तत्कालिन महिला कर्मचारी बी. व्ही. सिंधू हिने मुख्य कार्यकारी अभियंता तुकाराम मजगी यांनी आपला विनयभंग केला आहे, असा आरोप करत माळमारुती पोलीस स्थानकामध्ये 19 नोव्हेंबर 2014 रोजी तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर मजगी यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, असे सांगत तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याचबरोबर फोन करून फिर्याद मागे घेण्यासाठी मजगी यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती, अशा दोन तक्रारी 2015 मध्ये माळमारुती पोलीस स्थानकात दाखल केल्या होत्या. अशा तीन गुन्ह्यांमध्ये मुख्य कार्यकारी अभियंता तुकाराम मजगी यांना गोवण्यात आले होते. सदर महिलेवर अन्याय झाला आहे म्हणून वरील आरोपींनी साथ दिली होती. पोलीस स्थानकामध्ये तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व न्यायालयामध्ये हे सर्व जण हजर राहून त्या महिलेवर अन्याय झाला आहे, असे भासविण्याचा प्रयत्न केला आहे. सदर प्रकरण माळमारुती पोलीस स्थानकाचे तत्कालीन सीपीआय चन्नकेशव टिंगरीकर आणि जगदीश हंचनाळ यांच्याकडे तपास सोपविण्यात आला होता. मात्र असा प्रकार घडलाच नसल्याचे पोलिसांच्या तपासातून निदर्शनास आले होते.यावरून पोलिसांकडून न्यायालयात बी रिपोर्ट दाखल करण्यात आला होता.
येथील मुख्य जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणीदरम्यान साक्षी व पुरावे तपासण्यात आले. सरकारी पक्षाच्यावतीने 13 साक्षी, 18 पुरावे हजर करण्यात आले. तर आरोपी पक्षाकडून एक साक्षीदार आणि 32 कागदपत्रे पुरावे हजर करण्यात आले होते. मात्र, न्यायधीश एल. विजयालक्ष्मी देवी यांनी हे सर्व जण दोषी असल्याचा निकाल देऊन पुढील निकाल गुरुवार दि. 27 पर्यंत राखून ठेवली आहे. दोषी म्हणून जाहीर केल्यानंतर या सर्व आरोपींना पोलिसांना त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे. या खटल्यामध्ये महत्त्वाची भूमिका विशेष सरकारी वकील मुरलीधर कुलकर्णी यांनी बजावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून चपराक
या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान काही आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्यावरील हा खटला रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, मजगी यांनी सर्वोच्च न्यायालयात त्या विरोधात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर ते दोषी असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना आरोपींमध्ये समावेश करण्याचा आदेश दिला होता.
Home महत्वाची बातमी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करणारे हेस्कॉमचे 13 कर्मचारी दोषी
विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करणारे हेस्कॉमचे 13 कर्मचारी दोषी
मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल : उद्या ठोठावणार शिक्षा : खोट्या आरोपात गोवणाऱ्यांना दणका बेळगाव : विनयभंग केल्याचा खोटा आरोप करून हेस्कॉमच्या मुख्य कार्यकारी अभियंत्याला गुन्ह्यात अडकविणाऱ्या 13 हेस्कॉम कर्मचाऱ्यांना न्यायालयाने दोषी ठरवून त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे खळबळ उडाली असून अशाप्रकारे दोषी ठरविण्याचा पहिलाच निकाल असल्याने खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना चांगली चपराक बसली आहे. महिला कर्मचारी बी. व्ही. सिंधू, नाथाजी पी. पाटील, […]