वादळ, वीज कोसळून बंगालमध्ये 12 बळी

वादळ, वीज कोसळून बंगालमध्ये 12 बळी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची माहिती
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये सोमवारी (6 मे) रात्री जोरदार वादळ आणि वीज पडून 12 जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ही माहिती दिली. पूर्व बर्दवानमध्ये 5, पश्चिम मेदिनीपूर आणि पुऊलियामध्ये प्रत्येकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. नादियामध्ये भिंत कोसळल्याने 2 जणांचा मृत्यू झाला तर दक्षिण 24 परगणामध्ये झाड पडल्याने 1 व्यक्तीचा मृत्यू झाला. भारतीय हवामान विभागाने उत्तर बंगालमध्ये मंगळवार दुपारपासून गुरुवारपर्यंत वादळ आणि पावसाळी हवामानाचा इशारा जारी केला आहे. या कालावधीत, जलपाईगुडी, दार्जिलिंग, कालिम्पाँग, अलीपुरद्वार, कूचबिहार येथे विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 30-40 किमी वेगाने वाऱ्याची शक्मयता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उत्तर दिनाजपूर, दक्षिण दिनाजपूर आणि मालदा येथे विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 40-50 किमी वेगाने वाऱ्याची शक्मयता आहे.